May 20, 2024

“अपनी रानी किसी की दिवानी हो गई” म्हणत तरुणाची आत्महत्या

मी मेल्यावर माझी आठवण काढशील ना ग स्टेटस ठेवून युवकाच्या भावना व्यक्त

लोकनेता न्युज नेटवर्क

देऊळगाव राजा :- तालुक्यातील देऊळगाव मही येथील गजानन गुरव या तरूणाने आपल्या मरणाचे वेगवेगळे स्टेटस ठेवत खंडोबाच्या मंदिरात केली. ही घटना उघडकीस आल्यावर सुरेश रामदास गुरव यांनी पोलिसात तक्रार दिली. 

       गजानन गुरव हा देऊळगाव मही अल्पसंख्याक  काँग्रेसचा शहराध्यक्ष होता. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असतांना त्याने मोठा मित्र परिवार जोडला होता.

    संबंधित माहितीनुसार गजाननचे एका मुलीवर प्रेम होते. मुलीचे देखील प्रेम त्याच्यावर होते. पण अशातच प्रेयसिकडून प्रेमात धोका मिळाला. प्रेमावर विश्वास ठेवणार्‍या गजाननचा विश्वासाला तडा गेल्याने तो खचला. त्यातून त्याने आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलले.

मित्रांनो, आय अॅम सॉरी!

     गजानन गुरव १५ मार्चला पहाटे एक वाजता घराबाहेर पडून गावानजीक असलेल्या खंडोबा मंदिरात गेला. तेथून काही मित्रांना फोन केले, काहीशी संवाद साधला तर काहींनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, याचदरम्यान त्याने काही स्टेटस ठेवले. ‘आय अॅम सॉरी, मित्रांनो! मी सगळ्यांना सोडून जात आहे. मी गेल्यावर तुम्ही पण येणार ना माझ्या अंत्ययात्रेला, आज माझा जीव राहील, तर उद्या परत वाट बघेल तुझी. मी मेल्यावर न चुकता आठवण काढशील ना गं माझी…’ असे विविध स्टेटस त्याने ९.४५ वाजता सोशल मीडियावर ठेवले होते.

मित्रांनी केली इच्छा पूर्ण

एका स्टेटसवर अंत्ययात्रा दाखवली. अशीच माझी मिरवणूक काढा, असे त्याने नमूद केले. आपल्या मित्राची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी मित्रांनी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावातून अंत्ययात्रा काढत गजाननला शेवटचा निरोप दिला. यावेळी मित्रांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!