May 8, 2024

वाघोली ते कात्रज पीएमपीएल बस सेवा सुरू- प्रवाशांमध्ये आनंदाची लहर

लोकनेता न्युज नेटवर्क

हवेली :- वाघोली ते कात्रज बस सेवेचा उद्घाटन समारंभ वाघोली बस टर्मिनल केसनंद फाटा येथे पार पडला.
वाघोली ते कात्रज बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. कामानिमित्त व इतर पर्यटन स्थळांसाठी भेटी देणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल. कात्रज ला जाण्यासाठी इतर बस न बदलता एकाच बसणे कात्रजला जाणे सोपे झाले आहे.स्वारगेट पुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांची होणारी तारांबळ व सततच्या मागणीमुळे हि बस सेवा सुरू करण्यात आली आहे . श्री.संदीप(आबा) सातव ( माजी उपसरपंच ,युवा नेते भाजप वाघोली) ,श्री.सतिश गव्हाणे साहेब ( वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल),श्री. सोमनाथ वाघोले ( आगार व्यवस्थापक) श्री. बाळासाहेब गावडे, श्री.पुरुषोत्तम भवर, श्री.अमरदीप तमायचे, श्री. महेश गायकवाड, श्री .पोपट पालवे साहेब, श्री.तांदळे साहेब, तसेच श्री.सुनील भाबड (राष्ट्रवादी कामगार युनियन कार्याध्यक्ष PMPML) श्री.बंडू ढाकणे( संघटक जय भगवान बाबा) , श्री. दत्तात्रय दिवटे ( बस स्थानक इन्चार्ज) चालक, वाहक यावेळी उपस्थित होते.

       बसचा मार्ग क्रमांक 236 हा आहे वाघोली येथून सकाळी पहिली बस पहाटे ५ वाजता पासून शेवटची बस ९ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे तर कात्रज येथून सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी व रात्री शेवटची बस ११:१० मिनिटांनी सुटणार आहे.४५ मिनीटे ते १ तासाच्या अंतराने या बस सुटतील. उद्घाटन प्रसंगी ज्या बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला ती सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांची बस प्रवाशांनी खचाखच भरली होती . एकीकडे प्रवाशांमध्ये आनंद होता तर दुसरीकडे प्रवाशांना ईतर समस्यांचा सामना करावा लागतोय कारण अपुरे शौचालय आहे त्याची वेळोवेळी स्वच्छ्ता होत नाही , अस्वच्छ परिसर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, डांबरीकरण न केल्यामुळे धुळीचे लोट उठतात, पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी साचून खूप चिखल होतो अशा या सर्व समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो आहे या सर्व गोष्टीवर महानगरपालिका पीएमआरडीए ने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे व भौतिक सुविधा पुरविणे आवश्यक आहे.

प्रतिनिधी|संतोष कदम

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!