May 2, 2024

इंदापूर तालुक्यात शेतकऱ्याचे बैलांसह उपोषण

इंदापूर तालुका गंभीर दुष्काळ जाहीर करा -भगवान खारतोडे

लोकनेता न्यूज नेटवर्क

इंदापूर(अनिल खाडे) :- इंदापूर तालुक्यात गंभीर दुष्काळ व चारा छावणी अथवा चारा डेपो सुरु करा अशी जाहीर मागणी करणारे भगवान खारतोडे यांनी अखेर बुधवारपासून आपल्या दोन बैलांसह इंदापूर येथील निरगुडे गावामध्ये उपोषणास सुरुवात केली असून आज त्यांचा ६ वा दिवस आहे.

          खारतोडे यांनी ५८ दिवसांत दोन वेळा प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता, तसेच, दोन वेळा उपोषण च्या मागण्या मान्य करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, .तहसीलदारांनी लेखी पत्र देऊन संबंधित मागणीसाठी कृषी विभाग, महावितरण विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडे आदेशाद्वारे सूचित करूनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले, निरगुडे येथील तलाठी कार्यालयासमोर दोन बैलांसह उपोषणास सुरवात आहे.

 

          या उपोषणाच्या वेळी इंदापूरचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तालुक्यातील संबंधित विभागांची एकत्रित बैठक लावून या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तरीही खारतोडे यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला मात्र ग्रामस्थांनी तहसीलदार यांना लवकरात लवकर बैठक लावण्याची विनंती केली त्यावर तात्काळ बैठक लावण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार ठोंबरे यांनी दिले होते आज पर्यंत बैठक लावली नसल्याचेही खारतोडे यांनी सांगितले.

          शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री.माऊली वनवे यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष श्री.बापूराव सोलनकर व व्याख्याती प्रियदर्शन कोकरे इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व मा.उपसरपंच संदीप चांदगुडे ग्रामपंचायत म्हसोबावाडी चे सरपंच राजेंद्र राऊत युवा कार्यकर्ते श्री.विजय काळे श्री. विराज राजे भोसले तसेच निरगुडचे ज्येष्ठ नागरिक श्री.रामभाऊ काजळे पाटील यांनी भगवान खारतोडे यांची भेट घेतली.

          यावेळी निरगुडे गावचे सरपंच सौ.गौरी सोनवणे उपसरपंच श्री.हनुमंत काजळे पोलीस पाटील श्री .ऋषिकेश पवार श्री. युवराज भोसले श्री .देवेंद्र राऊत श्री .अमर भोसले श्री .बबन लकडे श्री.सागर पानसरे श्री .संपत घुले श्री .जयकुमार काजळे श्री .संजय लकडे श्री. गोविंद गोसावी श्री महादेव सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होत.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!