May 8, 2024

ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर शिवलिंग व कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दीड लाखावर भावीक

लोकनेता न्युज नेटवर्क

जुन्नर/मयूर ढोबळे :- श्री क्षेत्र ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर शिवलिंग हे पुरातन जागृत देवस्थान आहे व ओतूरचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा महादेव अशी गेले अनेक शतकांपासून भाविकांची श्रद्धा आहे शेकडो वर्षांपासून दर श्रावण महिन्यात श्री कपर्दिकेश्वर महारज यांची प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा भरते व श्रावणी सोमवारच्या संख्येनुसार शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार केल्या जातात त्यांच्या दर्शनासाठी अखिल महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक नवसपूर्तीसाठी येत असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देव धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व मार्गदर्शक जी.आर डुंबरे यांनी सांगितले.

                श्रावणी तिसरा सोमवार् असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शन बारीत गर्दी केली होती.भावीक हर हर महादेव कपर्दिकेश्वर महाराजांच्या नावाचा जयघोष करीत होते या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.
अधिक माहिती देताना देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे म्हणाले पहाटे ब्राम्हमुहुर्तावर कपर्दिकेश्वर शिवलिंगावर महाअभिषेक व महापूजा श्री व सौ.एकनाथ डुंबरे श्री व सौ.विमलेश गांधी,श्री व सौ पराग जगताप यांच्या हस्ते अभिषेक महापूजा व महाआरती करण्यात आली.
           या वेळी कपर्दिकेश्वर देव धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,जितेंद्र डुंबरे सचिन तांबे,पांडुरंग ढोबळे,सागर दाते महेंद्र गांधी पानसरे,अमोल डुंबरे,तन्मय इसकांडे,संजोग डुंबरे,सतिष तांबे,राजेंद्र हांडे देशमुख, देवधर्म संस्थेचे मंदिर पुजारी गोविंदकाका डुंबरे,अनिल काका तांबे, दत्तात्रयकाका शिंदे पुजारी उपस्थित होते. सकाळी सहा वाजता मंदिर गाभारा उघडण्यात आला व भाविकांना रांगेत सोडण्यात आले शिवनामाचा जयघोष करीत भाविकांना गाभाऱ्यात सोडण्यात येत होते.

            या वेळी ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व पोलीस पथक तैनात केले होते देवधर्म संस्थेचे स्वयंसेवक भाविकांना दर्शनासाठी सोडत होते फराळ वाटप – भाविकांसाठी पटेल गृपच्या वतीने एक हजार किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
          श्रेयस डुंबरे,अमोलकाका डुंबरे,तन्मय इसकांडे यांनी राजगिरा लाडू चे वाटप केले. ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आले होते . ओतूर पोलीस ठाण्याचे वतीने फिरते पोलिस पथक कंट्रोल कक्ष उभारण्यात आले होते.वाहन तळासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेसाठी खेळणीवाले,पाळणेवाले,मिठाई वाले यांची दुकाने होती याचा अस्वाद देखील यात्रेकरुंनी घेतला.
यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली.

          तिसरा श्रावणी सोमवार निमित्ताने ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिराजवळ कै श्रीकृष्ण रामजी तांबे अत्याधुनिक कुस्ती स्टेडियम आहे. या कुस्ती आखाड्यात नामांकित पहिलवान व कुस्ती गीर महिला उपस्थित असातात. नेत्रदीपक कुस्ती चितपट झाल्यावर ठरलेला इनाम दिला जातो. या आखाड्यात कुस्त्या जमविण्याचे काम अविनाश ताजणे,विकास डुंबरे,प्रकाश डुंबरे,दिगंबर काळे यांनी केले तर कुस्त्या सोडविण्याचे काम धनंजय डुंबरे,छबुराव थोरात,जालिंदर ढमाले यांनी केले.
        बबन डुंबरे व ज्ञानेश्वर खामकर,भाऊसाहेब खाडे यांनी समालोचन केले. [शिवजन्मभुमी जुन्नरचे आमदार अतुल बेनके ,ह.भ.प.चंद्रकांत महाराज डुंबरे यांच्यासह विविध क्षेत्रातील माण्यवरांनी आखाड्यात हजेरी लावली.] 

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.i

About Post Author

error: Content is protected !!