May 9, 2024

सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळा म्हणजे सर्व धर्म समभावाचे संवैधानिक आश्वासन ठरावे ! – विद्याधर महाले

लोकनेता न्युज नेटवर्क

चिखली :- आपल्या दानशूर तसेच सामाजिक व सेवाभावी उपक्रमामुळे मा. पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जगद्गुरु शंकराचार्यांच्या हस्ते ज्यांना दिल्ली येथे- जीवन गौरव – पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे स्थानिक महाराजा अग्रसेन रिसॉर्ट चे मालक अशोक अग्रवाल यांनी त्यांच्या सदरील रिसॉर्ट मधे, दि.०८-०४-२०२३ रोजी – स. ०९-३० वा. – सर्व धर्म सामूहिक विवाह सोहळा – आयोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये प्रमुख अतिथी या नात्याने निमंत्रित म्हणून आपले विचार मांडत असताना, महाराष्ट्राच्या उप मुख्यमंत्री यांचे स्वीय सचिव मा. विद्याधर महाले यांनी, सदर विषयानुषंगाने उपरोक्त उदगार काढले. तसेच तळागाळातील कोणत्याही आई वडील तथा पालकास आपल्या अपत्यांचे किंवा पाल्याचे लग्न अशा भव्य दिव्य सोहळ्यात झाल्याचा आनंद होणे म्हणजेच या कार्यक्रमाचे फलीत होणे आहे असेही विधान करून, या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जे जे काही करणे आवश्यक व शक्य आहे ते सर्व सहकार्य व मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. सदर बैठकीच्या प्रास्ताविकात अशोक अग्रवाल यांनी या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले तर आपल्या अखंड सामाजिक कार्यास्तव ज्यांना अमेरिकन विद्यापीठाकडून – डॉक्टर ऑफ सोशल वर्कस – ही पीएचडी प्रदान करण्यात आली असे डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट यांनी, सर्व धर्म सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या अशा विधायक कार्यक्रमांचीच आज आवश्यकता असल्याचे विषद केले. संजीवनी ब. उ. संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्ती जाधव यांनी त्यांच्या संस्थेमार्फत आजवर संपन्न झालेल्या अशा सामूहिक विवाह सोहळ्यांची पार्श्वभूमी कथन केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रतापसिंह राजपूत यांनी तसेच नागसेन बुध्दविहारचे अध्यक्ष गुलाबराव मोरे तथा सचिव डी. व्ही. खरात सर यांनी या सोहळ्याच्या पूर्ततेसाठी येणाऱ्या जबाबदारी व दक्षते संदर्भात समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक कार्यात सदैव सक्रिय सहभाग देणारे सभाष राजपूत यांनी या प्रस्तावित सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विवाहोत्सुक जोडप्यांचा प्रत्येकी चार लाख रुपयांचा विमा स्वखर्चाने काढून देण्याची घोषणा करून उत्साह भरला. या प्रसंगी मा. प्रकाश बुवा जवंजाळ, माजी नगराध्यक्ष सुरेश आप्पा खबुतरे, व्यास कॅन्सर ट्रस्टचे राजेंद्र व्यास, रामदेव इंडेनचे शैलेश बाहेती, उतराद पेठचे सरपंच मनोज जाधव, साकेगावचे गजूभाऊ डुकरे, अग्रसेनचे गोविंद अग्रवाल तथा अनूप अग्रवाल, संजीवनी चे हाटकर, नागसेन चे डोंगरदिवे सर व साळवे सर, हिवरा आश्रम चे ज्येष्ठ कविवर्य प्रा.पंढरीनाथ शेळके, बहुजन साहित्य संघ, चिखलीचे सचिव शाहीर मनोहर पवार तथा विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळे, संस्था व आस्थापनेचे ची पदाधिकारी व पंचक्रोशीतील सक्रिय कार्यकर्ता मंडळी असे बरेच मान्यवर उपस्थित होते.या बैठकीच्या बहारदार शेरोशायरी संपन्न सूत्र संचालनाची जबाबदारी ॲड. कस्तुरे यांनी उचलली तर सर्व मान्यवरांच्या चहा नास्त्याचे व्यवस्थापन अग्रसेन परिवारातर्फे करण्यात आले.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!