May 9, 2024

पुरोगामी शाहीर कलावंत आयुष्मान भारत साबळे यांना सन्मान पत्र प्रदान

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा :- फुले-शाहू-आंबेडकरी पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन गेल्या तीस पेक्षा जास्त वर्षांपासून गावोगावी महाराष्ट्रभर आपल्या शाहीरी-गायकी तथा वाद्यवृंदाच्या माध्यमातून सातत्याने समाज प्रबोधन करणारे मौजे चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा येथील शाहीर भारत साबळे यांनी मार्च, २०२३ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या महिला बचत गट प्रबोधन सप्ताहात बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात पंचशील संगीत मंडळ, चिखली समूहाद्वारे प्रबोधन सोहळ्यात सक्रिय सहभाग दिल्याबद्दल, त्यांना महामंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आलेले सन्मान पत्र आज पंचशील संगीत मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्या हस्ते सत्कारासह देण्यात आले. त्याबद्दल शाहीर साबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!