May 20, 2024

वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

लोकनेता न्युज नेटवर्क सिंदखेड राजा :- जगातील १ ल्या लोकशाही संसदेचे जनक, समतानायक , लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक , जगतज्योती , संत महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अक्षय तृतीया च्या दिवशी सर्व समाजाने एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा केली. महात्मा बसवेश्वर महाराज यांचे सामाजिक, राजकीय,आर्थिक, धार्मिक, आध्यात्मिक वचन तत्वज्ञान व १२व्या शतकातील परिवर्तनवादी जीवन कार्य यांचा प्रसार व्हावा या उद्देशाने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले त्यामध्ये नगराध्यक्ष सतीश तायडे , सर्व नगरसेवक तसेच विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संध्याकाळी लिंगायत समाज मठ संस्थान येथे विधिवत पूजन व आरतीत झाल्यानंतर भव्य रथात संत बसवेश्वर महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान नगरसेवक सौ. सारिका श्यामभाऊ मेहेत्रे व श्याम भाऊ मेहेत्रे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून त्यांच्या वतीने आइस-क्रीमचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेच्या नंतर दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक तसेच महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व कार्यक्रमात शहरातील प्रत्येक समाजातून शोभायात्रेचे स्वागत व पुजन करण्यात आले तसेच स्पर्धेत सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी भगवान परशुराम जयंती निमित्त ब्राह्मण समाज तसेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधव यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन संत बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. लिंगायत समाज मठ संस्थान यांच्या वतीने आयोजित जयंती उत्सवामध्ये वीरशैव लिंगायत समाजातील सर्व स्त्रिया व पुरुष , तरुण पिढी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहसंपादक|संतोष बुधवत _____________ 🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!