May 8, 2024

शिव साम्राज्य ग्रुप पुणे आयोजित सांधण व्हॅली गिर्यारोहकांचे यशस्वी आव्हान

लोकनेता न्युज नेटवर्क

पुणे :- शिवसाम्राज्य ग्रुपलोकनेता न्युज नेटवर्क आयोजित पुणे यांच्यावतीने धाडसी ट्रेकर्स ची सांधण व्हॅली ही यशस्वी मोहीम पार पाडत नवीन गिर्यारोहकांसाठी एक आदर्श निर्माण केलाय. 

      गिर्या रोहकांना शारिरीक तयारी बरोबरच मानसिक तयारी करावी लागते. या शिव साम्राज्य ग्रुप मधील सर्व धाडशी गिर्यारोहकांच कौतुक करावं तेवढ कमीच.

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.
      सांधण व्हॅली’ला पोहचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठाने साम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोहचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी(भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. या ट्रेक मध्ये धाडशी गिर्यारोहक संदिप राऊत, अमर माने, दीपक साळुंके, डायरेक्टर श्री.सर्जेराव उदागे ,आकाश नलावडे, ऐश्वर्या लगड, प्रगती खडके, विजय इंदुरकर, अभिजीत ढवळे , सोनू लोणे , डॉ.प्रिया कदम, मयुरी खेडेकर ,प्रसाद खामकर, कल्पेश गवंडे,दर्शन पाटील, ओजस पाटील, देव वय (८ वर्ष) ,प्रदीप सर आदींनी सहभाग घेतला. वॉलेंटियर नाशिकची टीम मावळे माउंटन रेंजर्स चेतन आणि दर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली संदन व्हॅली ट्रेक पार पडला.
          हि सफर यशस्वी करण्यासाठी गिर्यारोहकांमध्ये तेवढाच आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्या नंतर प्रत्येक गिर्यारोहकांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता.

प्रतिनिधी|संतोष कदम

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!