May 20, 2024

बालविवाह रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज

लोकनेता न्युज नेटवर्क

हिंगोली :- अक्षयत्रितिया व रमजान ईद च्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात बालविवाह केला जातो, त्यामुळे श्री कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फौंडेशन नवी दिल्ली हे बालविवाह निर्मूलणासाठी मोहीम राबवत आहे.16 ऑक्टोबर 2022रोजी बालविवाह मुक्त भारत अभियान ची सुरवात झाली आहे. देशाच्या अनेक राज्यात ही चळवळ राबवण्यात आली. बालविवाह निर्मूलणासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करणे व बळकट करणे आवश्यक आहे. यावर्षी अक्षयतृतीया व रमजान ईद च्या निमित्ताने कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फौंडेशन नवी दिल्ली यांच्या तर्फे “बालविवाह मुक्त भारत “या विषयावर राष्ट्रीय चर्चा व परिसवांद आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशभरातून स्वयंसेवी संस्था जमा झाल्या होत्या, आणि कायद्याचे कटोर पालन व्हावे असे सरकार ला आवाहन केले. यांच्या  बालविवाह प्रतिबंध निधी उपलब्ध करून 18 वर्षाच्या मुलींना मोफत शिक्षण देण्यात यावे अशी मागणी सरकार कडे करण्यात आली. बालविवाह ही समाजाला लागलेली अशी कीड आहे कि ती नस्ट करण्यासाठी श्री कैलास सत्यार्थी यांनी शंकणाद केला आहे.



सन 2030 पर्यंत बालविवाह मुक्त करण्यासाठी संस्था नि विविध उपाययोजनावर चर्चा केली. बालविवाह कायद्याची प्रभावी अंमलबजावणी साठी अधिकारी यांचा समावेश आहे, बालकल्याण समिती, पंचायत राज, अंगणवाडी, संस्था, इ. मधून बळकट केल्या पाहिजे.
ज्या मुलींना पालक किंवा समाजाच्या दबावामुळे लग्न करायचे नाही अशा शिक्षण किंवा नोकरीं करणाऱ्या मुलीकरिता निवासी व आर्थिक व्यवस्था असावी. ्यासोबतच बालविवाह रोखण्यासाठी दयासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था ही हिंगोली मधील बालविवाह थांबवण्यासाठी अंगणवाडी, आशाताई, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व महिला बचत गट यांना मिळून बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान दिले. दयासागर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था ता. कळमनुरी. जी. हिंगोली चे सचिव वैशाली सूर्यवंशी हे बालविवाह रोखण्यासाठी आजपर्यंत जनजागृती करीत आहेत.

प्रतिनिधी|विजय रोडे

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!