May 9, 2024

“आज दि.25 एप्रिलला स.8.00 वा.प्रा.अरुण बुंदेले यांची आकाशवाणी केंद्रावर मुलाखत”

लोकनेता न्युज नेटवर्क

अमरावती :- 90.4 F. M. रेडिओ कॉटन सिटी अकोला आकाशवाणी केंद्रावरून “मुलखावेगळी माणसं” या सदरामध्ये अमरावती येथील अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “अभंग तरंग “या काव्यसंग्रहावर आधारित मुलाखत “दि.25 एप्रिल 2023 ला सकाळी 8.00 वा. प्रसारित होणार आहे. 90.4 F. M. रेडिओ कॉटन सिटी अकोला आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गणेश बोरकर असून निवेदिका श्रीमती आश्लेषा कुलकर्णी यांनी प्रा.अरुण बुंदेले यांची मुलाखत घेतलेली आहे .या मुलाखतीमध्ये त्यांनी या काव्यसंग्रहातील



अभंग लेखनामागची भूमिका, किती विभागामध्ये ” अभंग तरंग ” विभागलेला आहे तसेच महाराष्ट्रातील सात मान्यवर साहित्यिकांच्या प्रस्तावनेविषयी सांगून या अभंग तरंग मधील अनेक थोरांचे अभंग आणि विचार अभंग मुलाखतीच्या शेवटी
प्रा.बुंदेले यांनी गाऊन दाखविलेले आहेत.
     यापूर्वी त्यांच्या नागपूर आकाशवाणी,अमरावती आकाशवाणी तसेच अकोला आकाशवाणी केंद्रावर साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक विषयावर मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत.आजपर्यंत प्रा.बुंदेले यांचे साहित्यिक,सामाजिक व शैक्षणिक विषयावर 11 पुस्तके प्रकाशित झालेली असून “वैचारिक लेखसंग्रह ” हे बारावे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.



      प्रा.अरुण बुंदेले यांच्या सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!