May 8, 2024

“कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालयात दि.२८ ला प्राचार्य डॉ.उद्धव जाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन “

" पालकासोबत विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन"

लोकनेता न्युज नेटवर्क

अमरावती :- कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालय सर्वोदय कॉलनी,अमरावतीच्या वतिने दि.२३ एप्रिल “जागतिक पुस्तक दिना “च्या निमित्ताने “पुस्तकं कशी आणि कोणती वाचावित”


       या विषयावर प्रमुख व्याख्याते कला व विज्ञान महाविद्यालय , कामरगाव ,ता.कारंजा,जि.वाशिम येथील प्राचार्य व प्रसिद्ध व्याख्याते डॉ.उद्धव जाने यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे.प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ.दीपाली दिलीप मालखेडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर नाचणे राहतील.हा पुस्तक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम शुक्रवार दि.२८ एप्रिल २०२३ रोजी सायं . ६ .३० वाजता संत रोहिदास महाराज सांस्कृतिक भवनामध्ये कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालय,सर्वोदय कॉलनी,काॅंग्रेस नगर रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.


       वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तक वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या पाल्यासोबत येऊन या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक प्रा.डॉ.संजय खडसे,सर्वोदय गृहनिर्माण संस्थेचे सचिव श्री.नरेंद्र गणोरकर , अभंगकार प्रा.अरुण बुंदेले आदिंनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
_____________

 

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in

About Post Author

error: Content is protected !!