May 8, 2024

“शांत महाराष्ट्र सुखी महाराष्ट्र”

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

हवाच आम्हाला । शांत महाराष्ट्र ॥
सुखी महाराष्ट्र । जीवनात ॥१॥

महाराष्ट्र माझा । संतांची ही भूमि ॥
थोरांची ही भूमि । भारतात ॥२॥

महाराष्ट्रात हे । निसर्गाचे लेणे ॥
सुंदर देखणे । मनःशांती ॥३॥

मनाची ही शांती । कुठे? भारतात ॥
महान राष्ट्रात । आमच्याच ॥४॥

माझा महाराष्ट्र । महान नि थोर ॥
थोरांचा विचार । आचरणी ॥५॥

बौद्ध दीक्षाभूमी । बाबासाहेबांची ॥
शांत सागराची । महाराष्ट्री ॥६॥

बाबासाहेबांचे । संविधान एक ॥
कलम अनेक । सुख शांती ॥७॥

माजू नये दुही । महान राष्ट्रात ॥
पेटवावी वात । आनंदाची ॥८॥

आम्ही सर्व एक । महाराष्ट्रीयन ॥
जुळविले मन । शांती साठी ॥९॥

महाराष्ट्र माझा । सौंदर्याची खान ॥
निसर्गाचे दान । चोहिकडे ॥१०॥

शिवाजी राजांचे । हिंदवी स्वराज्य ॥
प्रजेचे सुराज्य । महाराष्ट्री ॥११॥

फुलेंनी पुण्यात । शिक्षण देऊन ॥
घडविले जन । महाराष्ट्री ॥१२॥

सूर्य शिक्षणाचा । पुण्यनगरीत ॥
विद्या वृद्धिंगत । महाराष्ट्री ॥१३॥

शाहू महाराज । जनप्रीय राजे ॥
बहुजन राजे । महाराष्ट्री ॥१४॥

गाडगे बाबांचा । स्वच्छता संदेश ॥
शिक्षण संदेश । महाराष्ट्री ॥१५॥

ग्रामगीता वाणी । ग्रामा नि ग्रामात ॥
थोर राष्ट्रसंत । महाराष्ट्री ॥१६॥

श्री शिवाजी संस्था। भाऊसाहेबांची॥
गंगा शिक्षणाची । महाराष्ट्री ॥१७॥

राष्ट्रपती एक । प्रतिभा माहिला ।
मान हा पहिला । महाराष्ट्री ॥१८॥

वैज्ञानिक क्रांती । महासंगणक ॥
विजय जनक । महाराष्ट्री ॥१९॥

महाराष्ट्र दिनी । करू या नमन ॥
करांनी वंदन । हुतात्म्यांना ॥२०॥

संत कबीर कविराज पुरस्कार प्राप्त

अभंगकर्ता 
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर ,अमरावती .
भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!