May 1, 2024

भोकरदन शहरात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन

लोकनेता न्युज नेटवर्क

भोकरदन|दिपक सोनूने :- दरम्यान शिवाजी महाराज चौक मुख्य चौकात जाफराबाद रस्त्यावरील जालना रस्त्यावर तर महात्मा ज्योतिबा फुले चौकात सकल मराठा च्या तरुणांनी एकत्र येत टायर व लाकडे जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला, दरम्यान.जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला पाठिंबा म्हणून भोकरदन येथील मराठा समाजबांधव यांनी (दि.३०) भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्न त्याग आमरण उपोषण सुरू केले मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला वेळ देऊनही शासनाने आरक्षण दिले नाही त्यामुळे मनोज पाटील जरांगे पुन्हा अंतरवली सराटी येथे अन्न पाणी व औषध उपचार ही घेत नाहीत त्यांना पाठींबा देण्यासाठी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील बऱ्याच गावात नेत्यांना गावबंदी ही केली आहे जोपर्यंत सकल- मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही व मनोज जरांगे यांचा पुढील आदेश येत नाही.तो तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे सांगण्यात आले.

चौकट

रस्त्यांवर टायर जाळून निषेध       

        मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रत्येक गावात साखळी आंदोलन आणि अमरण उपोषण सुरू आहेत.तर (दि.३०) सोमवार रोजी शहरात जाफ्राबाद रोडला टायर जाळून आंदोलने घोषणाबाजी करत सरकार विरोधात घोषणा दिल्या देऊन निषेध करण्यात आला.त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब गड्याच्या रांगा लागल्या होत्या.मात्र,आता जोपर्यंत सरकार मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता असच हिंसक होत जाणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे.तर रविवारी रात्री महामंडळाच्या बसेस वरती बॅनर वर असलेल्या राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.

About Post Author

error: Content is protected !!