April 27, 2024

उपविभागीय अधिकारी अँक्शनमोडवर रूजू झाल्यानंतर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर,व ट्रॅक्टर पोलीस स्टेशन ला जप्त

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा/(ज्ञानेश्वर बुधवत) :- सिंदखेड राजा येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली व सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी आपल्या सहकार्यासोबत देउळगाव राजा च्या हद्दीमध्ये साठेगाव, नारायण खेड येथील खडकपूर्णा नदीपात्रात ता १८ मार्च रोजी रात्री ११ वाजेदरम्यान रेतीची अवैध वाहतूक करणारे एक टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून अंढेरा पोलीस स्टेशनला जमा केले आहे त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक पाऊल उचललेले आहे. सदर कारवाही 18 मार्च रात्री देऊळगाव राजाच्या हद्दीत करण्यात आली. सिंदखेड राजा येथे नुकतेच उपविभागीय अधिकारी म्हणून प्रा.संजय खडसे हे नव्याने रूजू झाले. सिंदखेड राजा उपविभागातील माहिती घेऊन देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांमधून खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध वाहतूक होत आहे अशी त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार ते स्वतः रात्रभर गस्तीवर होते. देऊळळगाव राजा तालुक्यामधील टाकरखेड भागिले, नारायण खेड, दिग्रस बु, देऊळगाव मही, चिंचखेड, खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत आहे अशी त्यांना माहिती समजली त्यांनी या माहितीच्या आधारे ते स्वतः रात्रभर गस्तीवर होते . त्यांना गस्तीवर असताना दोन वाहने अवैध रेती करताना आढळून आली त्यांनी त्या वाहनावर कारवाई करून अंढेरा पोलीस स्टेशन येथे जमा केली.या कारवाई दरम्यान तलाठी घरजाळे, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यामुळे अवैध रेती माफी यांचे धाबे दणाणले आहे.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!