May 8, 2024

कोल्हापूर राज्याचे आदर्श राजे “राजश्री छत्रपती शाहू महाराज”

लोकनेता न्युज नेटवर्क

     कोल्हापूर राज्याचे छत्रपती “यशवंतराव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे” म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज, इंग्रज राजवटी मध्ये आपला राज्य कारभार सांभाळत असतांना आपल्या राज्यातील प्रजेला कोणत्याही प्रकारे कळा सोसाव्या लागणार नाही या साठी रात्रंदिस जनतेसाठी योजना आखणारे आदर्श राजे..

       राज्यात दुष्काळ पडल्यावर आपल्याजनेतला मायेचा आश्ररा द्यायचा असतो, आणि छत्रपतींच्या पिढ्यांपिढ्या ह्या जनतेच्या कल्याणासाठी गेल्यात. दुष्काळाच्या काळात कोल्हापूर राज्यातली जनता ही स्थलांतर करू नये आणि छत्रपतींच्या राज्यातील जनता ही उपाशी झोपता कामी नव्ह अशा काळात, कोल्हापूर संस्थांनाचा कायापालट करणारे राजश्री शाहुंचे “राधानगरी धरण”. त्या काळचे देशातील सर्वात मोठे धरण आहे. राधानगरी धरण हे देशातील मोठे असावे म्हणून नव्हे तर आपल्या कोल्हापूर संस्थांनातील जनतेला जीवन जगण्यासाठी रोजरोटी मिळावी म्हणून सुरू केलेले काम हे देशाच्या इतिहासात नोंदल्या गेल, हे जस आपल्याला महत्वपूर्ण वाटेल त्यापेक्षा दुष्काळात आपल्या राज्यातील जनता ही अण्णाशिवाय मुर्तू मुखी पडली नाही. हा आनंद वेगळाच…

     १९०२ साली महाराजांनी युरोप चा प्रवास केला होता, यूरोपियन लोकांनी केलेली प्रगति पाहून महाराज प्रभावित झाले होते. योरोपियन जे करू शकतात ते आपण का नाही. तेथील धरणे पाहून आपण असे धरणे तयार करू शकतो , असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला,पण कोल्हापूर सारख्या लहान संस्थानाने मोठ्या धरणाच्या कामात हात घालणे इतक ही सोप नव्हतं आणि माझ्या मते छत्रपती ते अवघड देखील नव्हतं. ९ वर्ष या प्रकल्पाच काम चालल १९१८ साली तब्बल १४ लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प शाहू महाराजांनी पूर्ण केला त्याकाळी १४ लाख म्हणजे आज तीच किंमत कोटीची आहे. ४० फुटापर्यन्त बांधकाम केलेल्या या धरणाचे पाणी पंचगंगा नदीत सोडल्या जात. आणि बारमास हिरवी गार शेती या पाण्यातून फुलू लागली. तेव्हा महाराजांचे हरित क्रांतिचे स्वप्न पूर्ण झाले.

   छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात एक असा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि सर्व सामान्या जनतेला आरक्षण देऊन शिक्षण दिले. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले ते सर्वांना घ्यावच लागेल. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेतल्या जावे म्हणून राज्यात अनेक ठिकाणी वसतिगृह (हॉस्टेल) बांधली. मुलीनंसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधली. उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या. आज गोरगरिबांचे मूल ज्या शिष्यवृती मूळे शिक्षण घेऊ शकतात ते महाराजांनी आपल्याकळात शिष्यवृती ची संकल्पना मांडून शिक्षण दिले.

     भटक्या विमुक्त जातींचा महाराजांनी उद्धार केला. सर्व जनतेला समान सोईसुविधा पुरवल्या. बिर्टिशांसोबत राजनीष्टा, समाजचळवळींना गुप्त मदत, शेती, उद्योग्यधंदे, सहकार यासाठी नवनवीन संकल्पना. कोल्हापूर संस्थांनाला करविरनगरी ही भारतीय चित्रपटसुष्टीचे माहेर घर बनली.

    अनेक योजना महाराजांनी आपल्या राज्यात राबल्या, आपल्या राज्यात समाजहितासाठी नवनवीन कायदे अंबलात आणले. राजा केवळ राज्य करण्यासाठी नसतो, तर तो आपल्या राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठावण्यासाठी असतो याचे उत्तम उधारण राजश्री शाहू महाराज होते, पण आपल्या भाषेत म्हणतात ना चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतातच. शाहू महाराजांवर देखील अनेक वेळा टीका केल्या गेल्या.

    महाराज कार्तिक मासात नेमाने पहाटे पंचगंगेत आंघोळ करण्यासाठी जात असत. १८९९ साली महाराज नीत्यनियमाने अंघोळी साठी गेले असता एक दिवशी आपल्या कुटुंबातील ठराविक व्यक्तिसह महाराजांचे स्नेही प्रकांड पंडित राजाराम शास्त्री भागवत होते. स्नान चालू असतांना भटजी मंत्र बोलत होता आणि त्याच वेळी पंडित भागवतांचे लक्ष त्या भटजीने वेधून घेतले. भटजी हा “वेदोक्त मंत्रा एवजी पुराणोक्त” उच्चारत होता. छत्रपती हे वेदोक्त मंत्राचे 

अधिकारी आहेत हे राजारामशस्त्रींनी महाराजांच्या लक्षात आणून दिले. त्या वेळेस त्या भटजीने “शुद्रास पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात असे संगितले” अवकाशातून अंगावर वीज पडावी असे ते शब्ड कानावर पडले. क्षत्रीय कुलावंत महाराजांना एका भटजीने शूद्र म्हणून हिणवणे ही बाब सोपी नव्हे. पण त्या वेळेसची ती वस्तुस्थिति होती. ब्रम्हनांनी अनेक वेळा महाराजांवर टीका केल्या.

       भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांना गुरु मानले होते. ते केवळ महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशा बाहेर शिक्षण घेत होते तेव्हा वेळोवेळी पाठवलेल्या मदती मुळे नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांन सारख्या उच्च 

 

विचारांच्या माणसानं मुळे विकाससील होईल हे नक्की ज्या वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेरून भारतात परत आल्यावर महाराजांनी त्यांना भेटायला बोलावून घेतले आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांति महाराजांनी घडवली.

    उच्च विचारांचा राजा हा शूद्र असूच कसा शकतो हा प्रश्न मला आज देखील स्तब्ध करणारा आहे. जनहिता साठी ज्यांनो आपल आयुष्य अर्पण केल. त्याराज्याला कोटी कोटी प्रणाम ६ मे १९२२ रोजी एका युगाची समाप्ती झाली. ७ मे ला सूर्योदयास महाराजांची अंतयात्रा पंचगंगा नदीच्या तीरावर पोहचली. ज्या ब्रंहांनानी महाराजांना शूद्र संभावल होत अश्या ब्रंहांनाच्या वेदांना बाजूला ठेवून महाराजांनी स्थापन केलेल्या शिवाजी वैदिक स्कूलमधील विद्यार्थ्याने वैदिक मंत्रच्चार करून त्यांचे अंत्यसंस्कार केले. ४८ तोफांची शेवटची सलामी महाराजांना देऊन राजाराम महाराजांनी चितेस अग्नि दिला. आणि कोल्हापूर राज्याचे आदर्श राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज पंचतत्वात विलीन झाले.

•ज्ञानेश्वर सुरेश बुधवत
 मुख्यसंपादक ⭕दैनिक लोकनेता
 मातृतिर्थ सिंदखेड राजा
  9960209149

About Post Author

error: Content is protected !!