May 9, 2024

शेतकऱ्यांची चिंता संपली; कापूस दरवाढी बद्दल पहिल्यांदाच मोठे विधान

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

    शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कापसाला या वर्षी समाधान कारक असा भाव दिसत नाही.त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी अत्यंत कमी भाव असल्यामुळे शेतकरी राजा भाव वाढण्याची वाट पाहत आहे.आज तरी भाव वाढेल उद्या तरी भाव वाढेल अशी आशा बळीराजाला आहे.बघता बघता एप्रिल संपूर्ण संपून मे लागला तरीही शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला योग्य तो भाव अजून आलेला नाही.भाव वाढीबद्दल एखादे तरी मोठे विधान येईल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना आहे.मात्र आजपर्यंत एकही

असे विधान समोर आले नाही. शेतकरी वर्षभर कष्ट करून पांढर सोनं म्हणजे कापूस पिकवतो आणि वर्षभर कष्ट करूनही त्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याला मरावं की जगावे ही कळत नाही. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता संपूर्ण राज्यातील शेतकरी पिकांना योग्य भावा मिळत नसल्यामुळे परेशान झालेले दिसत आहेत. तरीही आजपर्यंत कापूस सोयाबीन कांदा या पिकांच्या दरवाढीबद्दल एकही मोठे विधान शासनाकडून झालेले नाही. भारत हा कृषिप्रधान देश आहे हे जरी खरे असले तरी इथला शेतकरी आज जिवंत असताना

 सुद्धा मेलेला आहे याला एकमेव कारण म्हणजे त्याने पिकवलेल्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आजही 70 टक्के कापूस हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये ठेवलेला आहे. योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी कापूस घराच्या बाहेर काढण्यास तयार नाही. एप्रिल संपूर्ण महिन्याला लागला तरीही कापसाचा भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या अपेक्षा तडा जाईल की काय? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरात सडणार तर नाही ना? नेमकं कापसाचे काय होणार याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

About Post Author

error: Content is protected !!