May 9, 2024

शंभु राजे

This get from this site or source

     आयुष्य जगाव कस हे माहिती नाही , पण शेवटी मराव कस हे शंभू राजेंनी शिकवलं. मरण हिमालयच्या पर्वत रांगेसारखे सामोर उभे असून मृत्यू अटळ आहे. हे माहिती असून सुद्धा शिवरायांच्या मराठी स्वराज्याचा वारसा न सोडता शिवपुत्र शंभू राजेंनी शरीराच्या अनेक व्यथा होऊन देखील शत्रू समोर झुकणार नाही हे अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला दाखवून दिल. शरीरातून रक्ताचे पाठ वाहत असतांना औरंगजेबा सारख्या भयाण शत्रूला राजे तुम्ही स्वत:हाचे सिंहासन सोडून तुमच्या समोर नतमस्तक होण्यास भाग पाडले.
       राजे सूर्य,चंद्र आहे तो प्रयंत मराठीच्या महाराष्ट्रात तुमच्या पराक्रमाच्या गाथा जीवंत राहतील. औरंगजेबाच्या हजारो पिढ्या पलटून ही शंभू राजेंच्या नावाची धास्ती त्यांच्या मनात राहील.औरंगजेबाने सुद्धा शेर का छावा संबोधल ते राजे संभाजी… #mr_dnyana❤️‍🩹

 

राजे तुम्ही दिली 

आम्हा स्वाभिमानाची जान 

पराक्रमाने झुकवली  

मोठ्या मोठ्यांची मान

शिवपुत्र शंभुराजे

राजे त्रिवार मानाचा मुजरा 

 

•ज्ञानेश्वर सुरेश बुधवत
मुख्यसंपादक दैनिक लोकनेता
मातृतीर्थ_सिंदखेड राजा

About Post Author

error: Content is protected !!