May 9, 2024

आदर्श विद्यालयाचा १२ वीचा निकाल 100 % टक्के

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- स्थानिक आदर्श माध्यमिक विद्यालयाचा 12 वीचा निकाल 100 % लागला आहे. विद्यालयात कु. कोमल रविकिरण जाधव -72.33% घेऊन प्रथम,कु. तन्वी दिपक म्हस्के -69.67% द्वितीय तर कु. श्रुती सोपान सहाने -68.83% गुण मिळवून तृतीय आली. विद्यालयातील एकूण 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत.
          सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रामकृष्ण दादा शेटे व सचिव श्री. प्रेमराजजी भाला आणि संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.

About Post Author

error: Content is protected !!