May 8, 2024

यावे तसेच जावे, जीवन असे नसावे…..! – डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली

लोकनेता न्युज नेटवर्क

येवला :- नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक येवला तालुक्यातील एक छोटेसे पण वैचारिक व तात्विक अधिष्ठान असलेल्या पिंपळगाव जलाल या खेडेगावातील, फुले-आंबेडकरी विचारांच्या कृतीशील चळवळीतील खंदे कार्यकर्ते शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या मुले, नातू तथा कुटुबीयांनी गेल्या वर्षी पासून ” शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान ” च्या माध्यमातून सुरू केलेल्या साहित्यिक विश्वातील दिग्गज मान्यवरांच्या सन्मान तथा पुरस्कार सोहळ्याच्या यंदाच्या द्वितीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित समारंभाच्या पूर्व संख्येला अर्थात दि. ३ जून, २०२३ रोजी आयोजित स्मृती दिन अभिवादन सभेमध्ये प्रमुख अतिथी या नात्याने महामानवांचे मानवीय सृजनशील विचार मांडत असताना डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी वरीलप्रमाणे –

यावे तसेच जावे,
जीवन असे नसावे !
विश्वात या व्यथांच्या
मातीत नीर व्हावे !!

ह्या आपल्याच लिहिलेल्या बोधप्रद ओळींनी सुरूवात करून वाघ कुटुंबीयांनी सामाजिक जाण व भान जपण्यासाठी या प्रतिष्ठानच्या द्वारे आरंभिलेल्या विधायक उपक्रमाचे कौतुक करून या त्यांच्या पवित्र कार्यात त्यांना मोलाचे सहकार्य करून त्यात सहभागी होणाऱ्या सर्व मित्र तथा सूज्ञ गावकरी यांचे हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी आवर्जून निमंत्रित करण्यात आलेल्या ज्येष्ठ कथाकार कवी बबनराव महामुने (हिवरा आश्रम-बुलढाणा), ज्येष्ठ कवी विष्णू वाघ वृक्ष-मित्र (सिन्नर), कवी विकास गुजर (कोल्हापूर) ई. नी आपले समयोचित विचार मांडले तर बुलढाणा जिल्ह्यातील बोरगाव काकडे येथील (श्रामणेर) अंकुश पडघान यांनी धम्म प्रवचनाद्वारे उपस्थित उपासक, उपासिका तथा नागरिक यांना प्रबोधन केले. सदर कार्यक्रमात नांदेड येथील कवी साईनाथ रोहटकर, बौध्दाचार्य आयुष्मान घोडके, संपादक प्रशांत वाघ, आयुष्मती यमुनाबाई वाघ तथा वाघ कुटुंबीयांसह या कार्यक्रमासाठी निमंत्रित तथा आवर्जून आलेली साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय तथा सामाजिक अशी विविध क्षेत्रातील मंडळी हजर होती.

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!