May 8, 2024

तब्बल २२ वर्षानंतर २००१ च्या १० वी च्या बॅच चा दिमाखदार स्नेह मेळावा पुणे येथे

लोकनेता न्युज नेटवर्क

पुणे :- रम्य ते बालपण , लहानपणीच्या आनंदमय आठवणी पुन्हा एकदा जगण्यासाठी वडगाव रासाई येथील छत्रपती विद्यालयात ३० ते ३५ वयोगटातील माजी विद्यार्थी पुन्हा एकदा लहान विद्यार्थी झालेले पाहायला मिळाले. १० वी नंतर सर्व विद्यार्थी आपापल्या मार्गाने पुढील शिक्षणासाठी दूर गेले परंतु या सोशल मीडियाच्या (व्हॉट्स ॲप, फेसबुक ई) च्या माध्यमातून सर्वजण हळूहळू ऑनलाईन भेटू लागले, आणि बऱ्याच वेळा स्नेहमेळाव्याचे नियोजन झाले पण ते यशस्वी झाले नाही. प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना शेवटी २२ वर्षानंतर तो योग जुळून आला. पुणे, मुंबई व इतर लांबून लांबून विद्यार्थी व शिक्षक मिळून जवळजवळ १०० च्या वरती कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष कौतुक मुलींचे कारण आता गृहिणी व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुली पण बरेच अडथळे पार करून स्नेहमेळाव्याला उपस्थित होत्या. तसेच शिक्षक पण बऱ्याच लांबून विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी आले होते. त्यातही शाळेचे माजी प्राचार्य जमादार सर व अडूळकर सर शरीराने थकले असले तरी माणूस मनाने कधी थकत नाही याचे उदाहरण देत शेवटपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अडूळकर सर यांनी भूषवावे या सूचनेला श्रीकांत घोरपडे यांनी अनुमोदन दिले तसेच कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन वैशाली निगडे, मिलिंद निंबाळकर व जयश्री बांगड यांनी पार पाडले, त्यानंतर मिलिंद निंबाळकर, वैशाली निगडे, दिगंबर घायतडक यांनी गायलेली शाळेची प्रार्थना सर्वांना परत शाळा भरायच्या वेळेत असणाऱ्या वातावरणात घेऊन गेली. फौजे मध्ये असणारे माजी विद्यार्थी मेजर दिलीप लष्करे , मेजर भास्कर शेलार , मेजर समीर इंगळे व प्रगतशील शेतकरी संतोष ढवळे ,यशस्वी व्यावसायिक मुकुंद ढवळे, सोसायटी चेअरमन शिवाजी शेलार या सर्वांच्या हस्ते शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. वर्गातील आठवणी परत जाग्या होव्या याकरता वर्गामध्ये बसून सर्वांनी एकमेकांचा परिचय दिला .तसेच बऱ्याच जणांनी शाळेतील आठवणी सांगून मनोगत व्यक्त केले. या मनोगतातून विद्यार्थ्यांना शाळेत प्रार्थेनेच्या वेळेत उपस्थित राहावे याकरता करावी लागणारी लगबग आठवली, शाळेतील पहिल्या सुट्टीतील एकमेकांच्या डब्यातील दोन घास खाणे, मधल्या सुट्टीत सवंगड्यांबरोबर शाळेच्या पटांगणात खेळ व शाळा सुटल्यावर घरी जाण्याची घाई आठवली.

            तसेच सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलानी सर स्टेजवर बोलायला येताच त्यांच्या विशेष स्टाईल मुळे कवायतीच्या वेळेस त्यांची असणारी शिस्त आठवली. गुंड सरांचे अर्थशास्त्र आठवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अडूळकर सर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. असा नियोजनबद्ध उत्कृष्ट कार्यक्रम आजपर्यंत झाला नाही तसेच या बॅच मधील विद्यार्थी हे शैक्षणिक, राजकारण , अध्यात्म , व्यवसाय , नोकरी , सरकारी नोकरी , समाजकारण व उत्तम गृहिणी अशा सर्वच क्षेत्रामध्ये कौतुकास्पद काम करत आहे याचा अभिमान असल्याचा उल्लेख केला. सध्याचे विद्यालयाचे प्राचार्य यांनीही सर्वांचे स्वागत व कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांतील सचिन शेलार जे कि वडगाव रासाई चे सरपंच आहेत त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. शिक्षक व विद्यार्थी वेळ काढून लांबून लांबून येथे आले तसेच मंडप व बैठक अरेंजमेंट असो कि उत्कुष्ट जेवण आणि वडगाव कुरुळी सादलगाव या गावातील विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस एक करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सिस्टेमॅटिक नियोजन करण्यासाठी भानुदास ढवळे, मिलिंद निंबाळकर, सचिन शेलार, वैशाली निगडे,अंकुश सुळसकर , समीर इंगळे, अंकुश सोनवणे, हेमंत कदम , डॉ सुजित शेलार , मारुती सोनवणे, उत्तम धायगुडे ,कौसर शेख या सर्वांनी खूप मेहनत घेतल्याबद्दल सर्व उपस्थितांनी यांचे कौतुक केले व धन्यवाद दिले. जाताना सुट्टी ची घंटा वाजली तरी पावले बाहेर निघत नव्हती आणि मनही तिथेच रेंगाळत होते , अशा प्रकारे हा आदर्श स्नेह मेळावा संपन्न झाला.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!