May 9, 2024

कपाशी बियाणाचे तीन पट भाव घेऊन लाचारांनी भरले घरे Deception of farmers

👨‍🌾शेवटी कृषी केंद्र चालकांनी देखील शेतकऱ्यांनाच लुटलं

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- जून महिना चालू झाला आणि मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची वाट बघून शेतकऱ्यांनी आपली पूर्व तयारी करायला सुरुवात केली… शेतीची मशागत करून पाऊस येण्याची वाट बघत शेतकरी थांबले.

      पाऊस पडेल तेव्हा कपाशी लावावी लागेल यासाठी शेतकऱ्यांनी थेट कृषी केंद गाठले. आणि शेतकरी अचानक स्तब्ध झालेत ते कपाशीची बायानाची भाव बघून.. आपण नेहमी म्हणतो की सरकार शेतकऱ्याचा मालाला भाव देत नाही. शेतकरी लुटल्या जातो. अस असल तरी सरकार शिवाय पण कृशिकेंद्र चालकांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार.. मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात बघायला मिळाला. देश हा नावालाच कृषिप्रधान आहे.. म्हणाव लागेल.. शेतकऱ्यानं करून 3 पट पैसे उखळून कृषी केंद्र चालकांनी आपली घर भरली.

         दोन दिवसा अगोदर नाथ कंपनी सोबत बोलत असतांना सांगण्यात आलं की नाथ कंपनीचे संकेत नावाचे कपाशीचे वान हे 850 रुपये बॅग ने विकल्या जात त्याची मूळ किंमत 850 आहे.. पण लाचार ठोक विक्रेत्यांनी किरकोळ विक्रेत्यांना जास्त भावात बियाणे दिले असल्याची माहिती आहे.. त्यामुळे याचा परिमाण शेतकऱ्यानं वर झाल्याचा दिसून आलं. 850 ची कपाशी बॅग चक्क अडीज ते 3 हजाराला विकण्यात आली आहे. बिल मागीतले तर बियानाच नाही असे उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळाली..

         शेतकऱ्यांची लूट होत असतांनाही या कडे कोणीही लक्ष दिलेले नाही.. या नंतर पाऊस पडताच , असाच प्रकार घडण्याचे संकेत आहे. या कडे कृषी खात्याने लक्ष द्यायला हवे. बियाणाचे खताचे भाव वाढवू शकता तर शेतकऱ्यांचा माल घेतांना का हे लाचार व्यापारी योग्य भाव देत नाही… देश हा कृषी प्रधान असला तरी इथे नेहमी शेतकरीच लुटल्या जातो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे… भ्रष्ट विक्रत्यान वर कारवाई होईलाच हवी. बाकी कोणत्याही माल हा एम र पी च्या जास्त भावाने विकल्या जात नाही.. मग शेतकऱ्यांनाच का भावापेक्षा जास्त पैसे घेऊन बियाणे देता.. याची लाज जास्त भावात बियाणे विकनाऱ्यांना वाटायला हवी… हा प्रकार ठोक विक्र्यात्यान कडून घडल्याची प्राथमिक माहिती आहे…


असे प्रकार घडू नये याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे…

•ज्ञानेश्वर सुरेश बुधवत
  मुख्यसंपादक दैनिक लोकनेता
  मातृतिर्थ सिंदखेड राजा
  9960209149

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!