April 27, 2024

सिंदखेड राजा तहसील कार्यालयात युवा संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी लोटांगण आंदोलन पीक कर्ज भरा किंवा नूतनीकरण करा असा सल्ला देणं बँकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

पीक कर्ज भरा किंवा नूतनीकरण करा असा सल्ला देऊन बँकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा(ज्ञानेश्वर बुधवत) :- निवेदने, मोर्चे, उपोषणे हे शासकीय कार्यालयासाठी नवीन नसून त्याकडे पाहुन न पाहिल्याचा प्रकार तहसील कार्यालयात घडत असल्याने सिंदखेड राजा शहारातील व तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे काय? त्यावर तहसील कार्यालय तोडगा काढणार की बाकी कामात मग्न च राहणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे? तालुक्यातील बँका पीक कर्ज वसुली करत आहेत खोटे आश्वासने देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. अशा विविध मागण्यासाठी युवा संघर्ष समितीने अध्यक्ष कैलास मेहेत्रे यांच्या सहित शेतकऱ्यांचे थेट तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयात लोटांगण आंदोलन .

युवा संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या

👇👇👇

1) सिंदखेड राजा नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थीवर उपासमारीची व गाव सोडून मजुरी करण्याची वेळ आली आहे. तरी घरकुल अनुदानाचा थकीत चौथा हप्ता तात्काळ मिळावा.

2) सिंदखेड राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ सदृष्य तालुका घोषीत झाला असून शासनाने शेतकऱ्यांना विविध दुष्काळी सवलती लागू केल्या. परंतु बँकांनी पिक कर्ज वसुली सुरू केली असून त्यापोटी शासनाच्या विविध अनुदानाच्या रकमेला बँका होल्ड लावत असून शेतकऱ्यांना पिक कर्ज भरा किंवा नुतणीकरण करा असा सल्ला देत असून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही.

 3) रब्बी हंगामात तालुक्यातील शेतकन्यांचे अतिवृष्टी, गारपीट आणी चक्री वादळामुळे झालेल्या मंजुर झालेल्या पिक नुकसानिची मदत शेतकऱ्यांना ताबडतोब करावी.

5) शेड्नेड धारक व बिजोत्पाक शेतकऱ्यांना स्वतंत्र प्रति शेडनेट धारक, बिजोत्पादक 2 लाख रुपये मदत द्यावी.

6) खरीप हंगामात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या तक्रारीचा मोबदला अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही तो तात्काळ मिळावा.

7) खरीप-रब्बी हंगामातील पिक विमा शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही दोन्ही पिक विमा सरसकट शेतकऱ्यांना मिळावा.

8) आयुष्यमान भारत योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व इतर योजनांचा लाभ व नविन नोंदणी तहसिल स्तरावर सुरू करावे.

9) शेतकन्यांच्या प्रलंबीत नविन विज जोडण्या, सोलार फिटींग तत्काळ मंजुर करुन व मंजुर झालेल्या जोडण्या तात्काळ जोडाव्यात.

10) शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सिबील अट रद्द करावी व नियमीत कर्जदार शेतकऱ्यांना मागील प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्यावे.

11) शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी.

12) शेतकऱ्यांना 100% अनुदानावर तारकुंपन योजना राबवावी.

13) शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणे रेशन मिळावे.

14) शहरातील सर्व दिव्यांगाना 100% अनुदानावर घरकुल योजना राबवावी. 

15) सुशिक्षीत बेरोजगारांना सरसगट प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ द्यावा.

16) प्रधानमंत्री आवास पुन्हा सुरू करुन जुन्या लाभार्थ्यांना लाभ द्यावा.

17) न.प. अंतर्गत सर्व विकास कामांचे कंत्राट (ठेके) स्थानिक सुशिक्षित बेरोजगार किंवा बचतगटांना द्यावेत.

18) शहरातील खोदकाम झालेले सर्व रस्ते तात्काळ दुरूस्त करावे.

             या सर्व मागण्या तात्काळ पुर्ण व्हाव्या यासाठी सिंदखेड राजा तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय युवा संघर्ष समितीचे लोटांगण आंदोलन जाऊन पोहचले. विविध समस्यांनी त्रस्त असलेले शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Post Author

error: Content is protected !!