लोकनेता न्युज नेटवर्क
नगर :- अकोले तालुक्यात दोन युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोले शहारालगत असणार्या धुमाळवाडी येथील युवराज नवनाथ धुमाळ (वय १९) याने आपल्या राहत्या घराच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. तर दुसर्या घटनेत अकोले शहरातील सुवर्णकार पंकज भगीरथ म्हसे (वय ३५) यानेही आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत बाबासाहेब लक्ष्मण धुमाळ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दोन्ही युवकांच्या आत्महत्यांबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन्ही घटनांतील युवकांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
__________________________
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.