April 27, 2024

देवाची आळंदी येथे वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी घटना

समाज घडवताना ढोंगी बाबा स्वत:च बिघडला

आळंदीत महाराजाचा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप तसेच आळंदीकर लावल्यास खबरदार चा इशारा

लोकनेता न्यूज नेटवर्क

आळंदी :- आळंदीच्या कीर्तीला डाग लावण्याची घटना श्री तीर्थक्षेत्र अलंकापुरी मध्ये घडली आळंदीतील मृदुंग संस्थाचालक स्वामी उर्फ दासोपंत उडाळकर महाराज वय वर्ष 52 या नराधमाने वारकरी शिक्षण संस्थेच्या आड अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केले सदर प्रकार कोणाला सांगितले जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत तक्रार न करण्यासाठी वारंवार जीवाची भीती दिली. सदर प्रकरणातील लहान मुलाला त्रास होऊ लागल्याने सदर बाब उघडकीस आली.मुलाच्या पालकांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले. आणि तक्रार नोंदवून घ्यावी यासाठी ठिय्या मांडला. तद नंतर आणखीन दोन विद्यार्थी समोर येऊन अनैसर्गिक कृत्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

      या प्रकाराने आळंदीकर ग्रामस्थ युवाशक्ती प्रचंड संतापलेली आहे आमच्या आळंदीचे नाव खराब होत आहे आणि कोणत्याही महाराजाला आळंदीकर नाव लावायचा अधिकार नाही या गोष्टीसाठी ग्रामस्थांनी तात्काळ आळंदीकर ग्रामस्थांची बैठक बोलावली या बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत बऱ्याच संस्थांमध्ये असे प्रकार आहेत आणि यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्याने आळंदीचे नाव पर्यायाने वारकरी समाजाच्या नावाची बदनामी होत आहे.या भावना व्यक्त केल्या पोलिसांनी कारवाई करायची ती करू द्या इथून पुढे असा जर काही प्रकार घडला तर युवाशक्ती सदर महाराजाला ठोकून काढील एवढा राग आळंदीची अस्मिता जपणाऱ्या युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर कुऱ्हाडे.अनिकेत कुऱ्हाडे सागर वहिले.सिद्धेश कुऱ्हाडे..महेश कुऱ्हाडे.प्रसाद बोराटे.संतोष भोसले या कार्यकर्त्यांकडून येत होत्या त्याचबरोबर युवा कार्यकर्त्यांना समजावून सांगत शांत होण्याचे आणि कायदेशीर मार्गाने संस्था बंद करण्याबाबत शांतता कमिटी सदस्य व माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे,, आणि शांतता राखण्याचे आवाहन केले जात होते. 

         संबंधित गंभीर प्रकरणाबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे. यांच्या अध्यक्षतेखाली आणि हभप निलेश महाराज लोंढे.माजी नगरसेवक डीडी भोसले. माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे. आज उत्सव कमिटी आळंदीकर ग्रामस्थ अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामस्थांची ग्रामसभा पार पडली. त्याचबरोबर विविध मनोगत मध्ये डी डी भोसले यांनी संस्थेबाबत असणाऱ्या त्रुटी यांची व्याख्या मांडली. आणि संबंधित महाराजांवर कायदेशीर कारवाई बाबतच्या कृती कल्पना विस्तारित केली. तर नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे,माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर,नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, यांनी वारकरी शिक्षण संस्था बाबतची अनधिकृतता तपासणी आणि त्यामुळे लागणारा आळंदीकर यांच्यावर लागणारा ” डाग ” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामस्थ आळंदीकर यांचा येथून पुढील काळात आणि येथून मागेही आळंदीकर महाराज म्हणून संबोधण्यात तीव्र विरोध असतानाही ह भ प महाराज मंडळी आळंदीकर उपाधी लावतात ती लावू नये जे आळंदीतील महाराज मंडळी जन्माने आणि कीर्तीने आळंदीकर आहेत त्यांनी लावण्यात हरकत नसल्याचे युवाशक्ती ग्रामस्थ सभेमध्ये बोलत होते. 

            सर्व महाराज मंडळी वाईटही नाही याबाबतही चर्चा विनिमय झाला परंतु असे प्रकार आळंदीत आणि वारंवार घडत आहेत काही उघडकीस आले तरच त्यावर चर्चा होते असाही सूर निघून आला. तसेच संस्था चालवत असताना जोग महाराज शिक्षण संस्थेच्या परवानगीने संस्थेला परवानगी मिळावी आणि विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या महाराजांवर कडक कारवाई करत त्याचे वकीलपत्र कोणी घेऊ नये असा एकमुखी ठराव करण्यात आला. वारंवार या गोष्टी आळंदीत घडतात महाराज मंडळी या रूपाने पैसा कमावतात आणि बदनामी मात्र आळंदीकर यांच्या पदरात टाकतात अशा स्वरूपाची तीव्र ना पसंती आणि राग आळंदीकर युवा ग्रामस्थांच्या मनामध्ये दिसून आला. सदर प्रकरणाचा गांभीर्य न घेतल्यास कायदा काही असो आळंदीचे नाव बदनाम करणाऱ्याला महाराजांना आम्ही ठोकून काढू. इथपर्यंत आळंदीकर ग्रामस्थ संतापलेले आहेत यावर पोलीस प्रशासनाने कारवाई केली असून गुन्हा रजिस्टर नंबर 19 /2024 प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार कलम 4, 5,एफ 8 9 10 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून भा.दं. वि.377 प्रमाणे आरोपीस वेड्या ठोकण्यात आले आहेत.तसेच आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या आड लैंगिक अत्याचार करणाऱ्यांची संख्या वाढते असल्याचे,सर्वेक्षणात दिसून येत असून यावर ठोस उपाय करण्यासाठी ग्रामस्थ मात्र संतापलेले दिसले.माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे.माजी नगरसेवक विष्णू वाघमारे.राष्ट्रवादी अध्यक्ष विलास कुऱ्हाडे.बाळासाहेब गायकवाड. वारकरी भाजप अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष संजय घुडरे.किरण येळवंडे,भागवत काटकर. संकेत वाघामारे.मनोज कुऱ्हाडे.एडवोकेट स्मिता घुंडरे. एडवोकेट नाजीम शेख.एडवोकेट निलेश चौधरी.रमेश जाधव.ह भ प गोविंद महाराज गोरे ह भ प पुरुषोत्तम पाटील ह भ प कावळे महाराज यांची उपस्थिती होती सदर.निषेध करत प्रतिकात्मक ‘धींड’ ही काढली जाणार आहे.अशी माहिती मिळाली आहे.

प्रतिनिधी/आरिफ भाई शेख

About Post Author

error: Content is protected !!