April 27, 2024

आगामी लोकसभा 2024 च्या अनुषंगाने उपविभागीय कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा(ज्ञानेश्वर बुधवत) :- आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकार बांधवांना आगामी लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी कशा पद्धतीने चालू आहे याबद्दल माहिती दिली.
     आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८५ पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदारांची नोंद झाली असून एकूण 3 लाख 12 हजार 576 एवढे मतदार आहेत, त्यापैकी ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल 11 हजार 676 (3.74%) तर शारीरिक विकलांग 2 हजार 889 (0.92%) नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 पेक्षा जास्त वयोगटातील आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
    ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर ५ दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ‘१२डी’क्रमांकाचा अर्ज सादर करावा. जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असून प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी करणार करण्यात येणार आहे.
दरम्यान, घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
      सर्व पत्रकार बंधूंनी हजेरी लावल्या बद्दल उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आणि येणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 साठी संपूर्ण सहकार्याची खात्री व्यक्त केली. आजच्या पत्रकार परिषदेत तहसीलदार सचिन जैस्वाल,नायब तहसीलदार सातव, प्रसार व प्रचार समितीचे नोडल सहाय्यक प्रकाश शिंदे, कोतवाल राजेंद्र खरात सह आदींची उपस्थित होती.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!