लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- Pm Kisan योजनेचा 14 हप्ता येण्याची सर्व शेतकरी बांधव वाट बघत आहे. पण या लाभासाठी केंद्र शासनाने 3 बाबी बंधनकारक केल्या आहे. या बाबींची पूर्तता करेल नसेल तर तुम्ही देखील 14व्या हत्यापासून वंचित राहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या बाबी काळजी पूर्वक वाचा.
♦महत्वाच्या 3 बाबी खालील प्रमाणे
- राज्याच्या भूमी अभिलेख नोंडीप्रमाणे अद्ययावत करणे.⇒आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधावा.
2. PMKISAN e-KYC प्रमाणीकरण करणे (e-KYC Done- No)⇒ 1. पी.एम. किसान पोर्टलवरील Farmers Corner मधील eKYC OTP आधारीत सुविधेद्वारे e-KYC प्रमाणिकरण करून घ्यावे. किंवा २. सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा 3. केंद्र शासनाच्या App द्वारे (Face Detection)
3. बैंक खाती आधार संलग्र करणे (Aadhar Seeding with Bank Account)⇒ 1.बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्र (Aadhar Seeded) करून घ्यावे. किंवा 2. पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडणे.
♦ लाभार्थीने पी.एम. किसान पोर्टलवर BENEFICIARY STATUS मधून तपासणी करून वरील बाबींची पूर्तता झाली असल्याची खात्री करावी.
♦ पी. एम. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित न राहण्यासाठी वरील बाबींची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येत आलेले आहे.
__________________________
संबधित बातम्या
ई-पिक पाहणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
यवत येथे भजन स्पर्धा आणि किर्तन मोहत्सवाचे आयोजन
सिंदखेड राजा तहसील कार्यालयात युवा संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी लोटांगण आंदोलन पीक कर्ज भरा किंवा नूतनीकरण करा असा सल्ला देणं बँकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक