May 9, 2024

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ऐतिहासिक स्थळाची स्वच्छता मोहीम संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा :- स्थानिक संत भगवान बाबा कला महाविद्यालय व नगरपरिषद कार्यालय सिंदखेड राजा यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्याधिकारी नगर परिषद सिंदखेड राजा यांच्या आदेशान्वये स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत शहरातील ऐतिहासिक स्थळाची स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वयंसेवक व स्वयंसेवकांनी आज दिनांक 9 जानेवारी, २०२३ रोजी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव व जिजाऊ सृष्टी येथे आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील इतर सहभागी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय सहभागी शाळा तसेच नगरपालिका सिंदखेडराजा येथील कर्मचारी वर्ग यांनी मिळून येथील परिसरात विद्यार्थ्यांनी खराटे हातात घेऊन हा परिसर स्वच्छ केला.

    तसेच रामेश्वर मंदिर व राजे लखुजी जाधव यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तेथील परिसरातील सुद्धा साफसफाई केली. संत भगवान बाबा कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वळसे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपला परिसर, आपले घर व आपल्या आजूबाजूच्या ऐतिहासिक स्थळे व मंदिरे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ सर्वेक्षण भारत या मोहिमेत महाविद्यालयातील युवकांनी योगदान द्यावे व संत गाडगेबाबा यांच्या ग्राम स्वच्छतेचे विचार आत्मसात करावे असे आवाहन केले.

       याप्रसंगी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. एन. नागरे व प्रा. डॉ. पी. बी. बोचे मॅडम तसेच प्रा. डॉ. एस‌. के. वळसे मॅडम, डॉ. एस. एन. तुरुकमाने, डॉ. ए. व्ही. खरात, श्री. भगवान नागरे व नगरपालिका कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

______________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!