May 9, 2024

नांदुरा क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच! दोन दिवसीय चॅम्पियन लीग साठी मैदान सज्ज

लोकनेता न्युज नेटवर्क

खामगाव :- दि 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी क्रिकेटचा भव्य थरार. राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरीय खेळाडूंचा व नांदुरातील नामवंत खेळाडूंची जुगलबंदी, तालुका क्रीडा संकुल मैदान दहीगाव रोड नांदुरा येथे दर्शकना पहावयास मिळेल. चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण चार संघ दोन दिवसांमध्ये सहा साखळी सामने खेळतील साखळी सामन्या सर्वोत्तम संघ फायनल मध्ये दोन आणि तीन क्रमांकाचा संघ एलिमिनेशन फेरी मध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेच्या उद्घाटना करता दिनांक 3 फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेशजी एकडे हे उपस्थित राहतील. क्रिकेट रसिकांनी मैदानावर उपस्थित राहुन स्पर्धेचा आनंद लुटावा. असे निवेदन एन सी सी एल आयोजकांनी केले आहे.

प्रतिनिधी|मनोज नगरनाईक

_______________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!