May 19, 2024

गोपाल तायडे यांना आंदोलन करते वेळी पोलिसांन कडून अटक

डॉ.अण्णा साठे नगर येथील चेंबर जोळणी चे होते प्रकरण

लोकनेता न्यूज नेटवर्क

शेगाव :- डॉ. अण्णा भाऊ साठे येथील चेंबर जोळणी संदर्भात गोपाल तायडे यांनी दोन फेब्रुवारी रोजी आंदोलनाच्या ईशारा दिला होता. त्या मुळे नगर परिषद प्रशासन हादरले आणि मुख्य अधिकाऱ्यांन चेंबर जोळनीचे वर्क ऑर्डर देण्यात आले.व कॉलनीतील काम ही सुरु करण्यात आले. परंतु थोडं खोंद काम केले म्हणजे काम झाले असे होत नाही. काम पूर्ण होण्याकरिता कॉलनीतील काही महत्वाचे टॉयलेट चेंबर जोळणी करणे ही आवश्यक आहे.दोनच ठिकाणी चेंबर जोळणार असल्याने कॉलनीतील टॉयलेट चेंबर अळचन कायमची मिटणार नाही. त्या करीता वर्षा भरा अगोदर कॉलनीतील पाच ठिकाणाचे घेतलेले मेजरमेंट

1) B.15 ते 35 मिटर.
2) B. 13 ते सभागृह 10 मिटर.
3) A.100 ते सभागृह
5 मिटर.
3 ) अ 37 डी. पी. लाईन 15 मिटर.
5) शौर्य किराणा 15 मिटर.

ह्या ही ठिकाना चे चेंबर जोळन्याचे काम करणे आवश्यक आहे. तसेच कॉलनीतील 28 चेंबर साफ करणे जरुरी आहे या नुसार काम होत नसल्याने चेंबर जोळणी कामाचे स्वरूप व कामाची व्याप्ती ही कमी असल्याने. त्याच बरोबर पंधरा नवीन चेंबर बांधन्याच्या मागणीला नगर परिषदे कडून धुळकाऊन लावले आहे.व अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचे काम होणार आहे अशे लक्षात येत आहे. त्यामुळे गोपाल तायडे यांच्या कडून नगर परिषदच्या मुख्य पाण्याच्या टाकीवर
चडून नगर परिषदेचा निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत अस्ताना पोलीस प्रशसना सुगवा लागला त्या मुळे त्यांना पाण्याच्या टाकीवर चळत अस्ताना रोखण्यात आले व अटक करून डिटेन करण्यात आले. कॉलनीतील चेंबर जोळणी संदर्भात कोणतीच तळजोळ करणार नाही. जो पर्यन्त योग्य रीत्या कॉलनीतील टॉयलेट जोळणी काम होत नाही. तो पर्यन्त करीत राहील असे प्रसार मध्यमाशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी|मनोज नगरनाईक

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!