May 8, 2024

जगात अशी कुठलीच स्त्री नाही तिला मासिक पाळी येत नाही – रामेश्वर वसु (महिला व बालकल्याण संरक्षण अधिकारी बुलढाणा)

लोकनेता न्युज नेटवर्क

चिखली :- दि. 4 फेब्रुवारी 2023 ला श्री शिवाजी हायस्कूल इसोली या ठिकाणी श्री रामेश्वर वसु महिला व बालकल्याण संरक्षण अधिकारी बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थिनींच्या आरोग्या संदर्भात आपल्या विचारातून जागृती केली. महिलांचे आरोग्य , महिलांचे मासिक पाळी विषयी अज्ञान व समाजाची मानसिकता,बालकांचे आरोग्य व बालकांचे अधिकार , बालकांचे लैंगिक शैक्षणिक आर्थिक शोषण ,बालविवाह कायदा.याबद्दल अतिशय विस्तृतपणे इयत्ता आठवी नववी व दहावीच्या मुलांना याप्रसंगी त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक हि.रा. गवई सर व आभार प्रदर्शन जी.बी मेरतकर सर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ.उमेश सावजी स्त्री रोग तज्ज्ञ, मोहम्मद रईस, विष्णू आव्हाले गणराज्य फाउंडेशन,सूर्यवंशी सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक राम शेळके उपस्थित होते.

______________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!