May 9, 2024

वारीशे हत्या प्रकरणाचा निषेध, पत्रकारांवरील भ्याडहल्ले खपून घेतल्या जाणार नाहीत – दत्ता जायभाये

लोकनेता न्युज नेटवर्क

किनवट :- दि. 10-2-2023 रोजी किनवट तालुका पत्रकार परिषदेतर्फे निषेध सभा घेण्यात आली या सभेत राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा किनवट तालुका पत्रकार परिषद तालुका शाखा किनवट च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारावर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गून्हेृ दाखल करायला टाळाटाळ केला जातो.  त्यामुळे राज्यात निर्धार पणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. आता यापुढे अशा भ्याड घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. असे जाहीर आवाहन सदर परिषदेचे अध्यक्ष दत्ता जायभाये यांनी केले. यावेळी किनवट तालुका पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल भंडारे, सचिव दिलीप पाटील, कार्याध्यक्ष मलिक चव्हाण, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे, जेष्ठ पत्रकार अशिष देशपांडे, साजिद बडगुजर, परमेश्वर पेशवे, एस. अहेमदअली, नागनाथ भालेराव, मधूकर अन्नेलवार, किशन परेकार, गौतम येरेकर, संतोष जाधव, व सर्व सदस्य उपस्थित होते. अशा निच घटना सातत्याने वाढत असल्याने विशेषतः ग्रामीण पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. महानगर टाईमचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे आपल्या दुचाकीने जात असताना एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जाणीवपूर्वक त्यांच्या अंगावर वाहन घातले आणि यात एका प्रामाणिक पत्रकारांचा नाहक बळी गेला हा अपघात असल्याचे दाखविण्यात येत असले तरी हा अपघात नसून घातपात असल्याचे या निवेदनात नमुद केले आहे. पंढरीनाथ आंबेरकर त्याच कारमध्ये होते त्यांची बातमी छापल्यामुळे सूडबुद्धेने पत्रकारांचा बळी त्यांनी घेतला त्यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक जलदगती न्यायालयात करण्यात यावा. पत्रकार संरक्षण कायद्याची अमल बजावणी काटेकोरपणे अमलात आणावी यासह पत्रकारावर जीव घेणे हल्ले करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा करावी. अशी मागणी ही करण्यात येणार असल्याचा ठराव या वेळी घेण्यात आला आहे.

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!