May 8, 2024

“शेतकरी पोल्ट्री योद्धा संस्थेची” पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

उरळगाव दि २६ :- “शेतकरी पोल्ट्री योद्धा संस्थेची” १ली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष आणि दत्तात्रय वाळके यांच्या हास्ते करण्यात आले
प्रमुख अतिथी डॉक्टर संदीप आर गायकवाड सर (व्हेटर्नरी फिजिशियन अँड सर्जन) यांनी तालुक्यातून सभेसाठी आलेल्या सर्व पोल्ट्री धारक शेतकऱ्यांना उन्हाळ्यात बॉयलर पक्षांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे यासाठी अगदी सोप्या शब्दात मार्गदर्शन केले
शेतकरी पोल्ट्री संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मिनीनाथ फक्कड थोरात साहेब त्याचप्रमाणे सचिव श्री सचिन ज्ञानदेव परभाणे , सहसचिव श्री सुनील वागदरे, खजिनदार श्री गोरख लगड, आदी पदाधिकारी उपस्थित होते
तसेच कार्यकारी मंडळातील संचालिका सौ वैशाली चंद्रकांत बांगर श्री अशोक पावसे (संचालक) श्री शेखर कंक(संचालक) श्री गणेश दरेकर (संचालक) श्री रामचंद्र टाकळकर (सल्लागार) हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोरख लगड साहेब यांनी केले आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली
सभेचे अध्यक्ष म्हणून श्री मिनीनाथ फक्कड साहेब यांनीअध्यक्षस्थान स्विकारले
सुरुवातीला प्रस्ताविक करत असताना सचिव श्री सचिन परभाणे यांनी एका वर्षापासून चा संस्थेच्या इतिहासाचा जीवनपट सर्वांसमोर मांडला
संस्था कशाच्या आधारे चालत असतात हे फार्मर्स ना आणि उपस्थित त्यांना सांगत असताना सचिन परभाणे यांनी संस्थेसाठी जी घटना धर्मादाय आयुक्त पुणे यांनी ठरवून दिली आहे तिचा अगदी सोप्या शब्दात फोड करून घटनेचे महत्त्व संघटनेसाठी किती महत्त्वाचे असते हे पटवून दिले
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या सर्व संचालक सभांचा आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे संस्थेने सर्वसामान्य पोल्ट्री फार्म साठी जवळपास केलेल्या सर्वच कामांची यादी श्री सचिन परभाणे यांनी सभेला वाचून दाखवली
संस्थेच्या मागील वर्षाच्या हिशोबाचे जमाखर्चाचे वाचन संस्थेचे खजिनदार श्री गोरख लगड साहेब यांनी सभेसमोर केले
संस्थेला पुढील सन २०२४ यावर्षी करावयाच्या कामासाठी जे अंदाजपत्रक सचिवांनी सभेसमोर मांडले त्यास श्री आबासाहेब ठोंबरे यांनी सुचक म्हणून मान्यता दिली आणि श्री शिवाजी शेलार यांनी त्यास अनुमोदन देऊन हा ठराव सर्वांनुमतेमंजूर करण्यात आला
सभेमध्ये ऐनवेळीच्या विषयांमध्ये बोलत असताना श्री गणेश मगर यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी तसेच पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाविषयी अध्यक्षांचे कौतुक केले
शेतकऱ्यांच्या मधून अडीअडचणी संदर्भात बोलत असताना श्री शिवाजी शेलार यांनी शालिमार कंपनी संदर्भातील मुद्दा सर्वांसमोर मांडला त्यावेळी त्यांनी सभेला सांगितले की शालिमार कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शिरूर पूर्व भागातील जवळपास १२ पोल्ट्री धारक शेतकऱ्यांना फटका बसला होता त्यांना पेमेंट मिळाले नव्हते आणि हे सर्व शेतकऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष थोरात साहेब त्याचप्रमाणे सचिव सचिन परभाणे साहेब, खजिनदार गोरख लगड साहेब यांना सांगितले असता त्यांनी लगेच कारवाईला सुरुवात केली आणि देवाची उरुळी येथे सर्व शेतकऱ्यांसह या पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारून त्यांना हे पेमेंट शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडले अशा पद्धतीने केवळ संस्थेच्या माध्यमातून आमच्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला असे समाधान शेतकऱ्यांच्या वतीने श्री शिवाजी शेलार यांनी व्यक्त केले
अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपले पुढील वर्षासाठीची भूमिका सभेसमोर मांडली त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून केलेल्या २२ कामांची सूची उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडली
संस्थेच्या कामावरती उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीने श्री तुकाराम शिंदे, श्री चंद्रकांत बांगर श्री अनिल साकारे, श्री अनिल मिटगुले.श्री डफळ, स्वप्नील खरात, विठ्ठल गायकवाड,सुरज बारवकर,राहूल नलगे, कैलास थोरात, तुकाराम रावडे, विकास नरवडे, विकास काशीद, सचिन गुणवरे, कृष्णा फराटे, विजय सातकर, विजय सुर्यवंशी, राजेंद्र बांगर, कांताराम बगाटे,टाकळी डोकेश्वर, बाळासाहेब थिटे फार्मर त्याचप्रमाणे अनेक मान्यवर शेतकऱ्यांनी मते मांडली आणि संस्थेचे आभार व्यक्त केले
भविष्यात देखील संस्था महाराष्ट्र पोल्ट्री फेडरेशन चे अध्यक्ष श्री अनिल खामकर साहेब आणि सचिव श्री साळवी साहेब, श्री नंदकुमार चौधरी (उपाध्यक्ष-महाराष्ट्र पोल्ट्री फेडरेशन)श्री शरद गोडांबे (-पुणे विभाग कार्याध्यक्ष)
आणि संपूर्ण महाराष्ट्र पोल्ट्री फेडरेशन , महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली काम करत राहील अशी ग्वाही संस्थापक अध्यक्ष श्री मिनीनाथ फक्कड थोरात यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली
उपस्थित सर्वांचे शेवटी श्री दत्तात्रेय वाळके (चेअरमन वि.वि.सेवा.सोसायटी करडे) यांनी आभार मानले
चंद्रभागा गार्डन मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक व श्री विक्रम पाचूंदकर यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले
आणि मा.अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.उपस्थित सर्वांसाठी संस्थेच्या वतीने चहा नाश्ताची सोय केली होती त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि आनंदाच्या वातावरणात सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

प्रतिनिधी|संतोष कदम

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!