May 8, 2024

बुलढाणा जिल्ह्याचे अंकुश पडघान यांचा केंद्रीय मानवाधिकार संगठन तर्फे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सत्कार

लोकनेता न्युज नेटवर्क

पुणे :- बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश श्रीपत पडघान यांचा, त्यांनी एक जागरूक नागरिक या नात्याने आजवर केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल म्हणून, केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली तर्फे सुविख्यात बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात कें. मा. सं. चे मा. अध्यक्ष डॉ. मिलिंद दहीवले यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी केंद्रीय मानवाधिकार संगठनचे सबंध भारतातून आलेले माऊंट अबू येथील मा. बिके जितू, सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य सारीका कुळकर्णी त्र्यंबकेश्वर, मा. भाग्यश्री बोरकर पुणे, कें. मा. सं. च्या नॅशनल कोअर कमिटीचे सदस्य मा. बबन महामुने, डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली ई. सह कें. मा. सं. च्या शेकडो कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांच्या सत्कारासह उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!