May 20, 2024

राज्यात आयात होतो कांदा! शेतकऱ्यांनचा झाला वांदा! राज्यातील शेतकरी चिंतेत विधान भवनात जोरदार घोषणाबाजी!

लोकनेता न्युज नेटवर्क

मूबंई :- बाजारपेठेत कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कांद्याला उठाव मिळताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. या मुद्द्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारच्या धोरणावर टीका केली असून सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्यांची मजुर व व्यापारी यांना कशी वागणूक दिली जात आहे, याबाबतचा किस्सा अलीकडेच उघडकीस आला आहे. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने ५०० किलो कांदा विकल्यानंतर त्याचा उत्पादन खर्च निघून केवळ २००० हजार रुपये व्यापाऱ्याने त्याच्या हातावर टेकवून त्याची बोळवण केली. राज्यात सर्वत्रच असे प्रकार घडत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे आपणच कैवारी असल्याचे ढोंग करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला अद्यापही जाग आलेली दिसत नाही. या सरकारचा विरोधकांनी विधानभवनाच्या दारात धिक्कार केला. सरकारच्या निष्क्रियतेबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याचेच पडसाद आज विधानभवनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या आमदारांनी कांदा आणि लसणाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व आमदारानी विधान भवनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

प्रतिनिधी|विजय रोडे

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!