May 9, 2024

अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे ए,एस,आय, राजेभाऊ शेळके यांना मातृशोक प्रयागबाई बळीराम शेळके यांचे अपघाती निधन

लोकनेता न्युज नेटवर्क

परळी :- अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय – 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.

     याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

     प्रयागबाई शेळके यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे रविवारी दुपारी 5 वाजता करण्यात येणार आहेत.

प्रतिनिधी|विजय रोडे

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!