May 9, 2024

वरपूडकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

लोकनेता न्युज नेटवर्क

सोनपेठ :- येथील कै.रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी “स्वतंत्र भारताच्या लोकशाहीकरणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान” या विषयावर भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, मुंबईच्या सहकार्याने ही एकदिवसीय परिषद संपन्न होत आहे. श्री पंडिरगुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा, वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर, जनविकास महाविद्यालय, बनसारोळा आणि कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय परिषद संपन्न होत असून या परिषदेचे उदघाटन पाथरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री सुरेश वरपूडकर साहेब करणार असून अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेब राहणार आहेत. या परिषदेत प्रो.डॉ.राजाभाऊ बेद्रे, संचालक, अकॅडेमिक स्टाफ कॉलेज, सागर विद्यापीठ, मध्यप्रदेश हे बीजभाषण करणार असून सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि विचारवंत प्रो.डॉ.प्रकाश पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या एकदिवसीय परिषदेत डॉ.संजय गायकवाड, डॉ. रत्नाकर लकशेटे आदी मान्यवरांबरोबर विविध राज्यातून संशोधक आपले शोध निबंध सादर करणार आहेत. तेंव्हा दिनांक 15 एप्रिल रोजी संशोधक आणि इतर प्राध्यापक बंधू-भगिनींनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ.अरुण दळवे, प्राचार्य डॉ.हरिभाऊ कदम, समन्वयक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, डॉ.तिडके के.डी., डॉ.बापूराव आंधळे, डॉ.राजेश गायकवाड, डॉ.मकरंद जोगदंड, डॉ.एस.डी.दिक्षित, डॉ.अशोक गोरे आदींनी केले आहे.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!