May 9, 2024

जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची गरज – प्रा. डॉ. संघर्ष सावळे

लोकनेता न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर :- दि.२९-०४-२०२३ रोजी, साहित्यधारा ब. उ. सेवाभावी संस्था, औरंगाबाद तर्फे २५८५ व्या बुद्ध जयंती पर्वावर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, महानगरपालिका, औरंगाबाद च्या रमणीय परिसरातील भव्य दिव्य सभागृहातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तथा बुध्दवाणी कविसंमेलनात बोलत असताना, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स सोसायटी स्टुडंट्स ॲम्बेसेडर, स्कॉटलंड यार्ड प्रा. डॉ. संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी वरील उदगार काढले. या सोहळ्याच्या पहिल्या सत्राचे उदघाटन डॉ.जयश्री सोनकवडे यांच्या 

हस्ते सुप्रसिद् अहिरे स्पर्धा अकादमी, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद अहिरे, डॉ. भन्ते चंद्रबोधी, डॉ. धीरजकुमार भारती – दिल्ली, डॉ. किर्तीमालीनी जावळे, प्रा.डॉ. वैशाली मेश्राम, डॉ. चेतना सोनकांबळे ई. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्यिक तथा सामाजिक क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शीतल शेगोकार – शेगाव, शाहीर भारत साबळे – चिखली-बुलढाणा ईत्यादींसह इतरही समाज सेवकांचा पुरस्कार व सन्मान पत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय सत्रात अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक मा. डी. डी. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक क्षेत्रातील अखंड सेवेस्तव दक्षिण-पश्चिम अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेटने सन्मानित डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली तथा ज्येष्ठ साहित्यिक बी. डी. पवार व मा. प्रा. स्नेहल अभ्यंकर, पुणे अशा विद्वत्जनांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कविसंमेलनात राज्य भरातून 

निमंत्रित नागोराव सोनकुसरे-नागपूर, माणिकराव गोडसे-नाशिक, यशदा पांढरे, दत्ता कल्याणकर, भास्कर अमृतसागर ई. धुळे, शाहीर मनोहर पवार, ज्येष्ठ कथाकार कवी बबनराव महामुने, शाहीर भारत साबळे, मंजूताई जाधव, डॉ. तृप्ती महाले/काटेकर, अंकुश पडघान, शीतल शेगोकार, विद्या सरपाते ई. बुलढाणा तर सीमाराणी बागुल-नाशिक, कल्पना निंबोकार-औरंगाबाद, बालाजी मन्नाडे-पालघर, उमाकांत आदमने-पुणे तथा इतरही मान्यवर कवी-कवयित्री यांनी तथागत बुद्ध आणि त्यांच्या मानवीय बुध्दीवादी तत्वज्ञानावर आपापल्या प्रबोधनपर रचना मराठी, हिंदी तथा उर्दू मधून सादर करून कार्यक्रमाचे महात्म्य वाढविले. तर हरहुन्नरी साहित्यिक कलावंत डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या- जयभीम जयभीम जयभीम वाल्यांची कशी निघाली टोळी गं ! महूच्या वाटं निघल्यात माझ्या भीमाच्या लेकीबाळी गं !!या काव्यगीताला सर्व आबालवृद्ध रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या 

कडकडाटासह त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गाऊन साथ केली. सर्व सहभागी कवींचा सन्मान पत्र तथा स्मृती चिन्ह देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. भरीसभर म्हणजे नाशिक येथील प्रख्यात सूत्रसंचालक मा. अर्चना झोटींग तथा अमरावतीचे प्रा. संजय धांडे यांच्या समर्थ सूत्र संचलनाने या संमेलनात वेगळेच चैतन्य भरले तर या संपूर्ण संमेलन समारंभात सातत्याने सर्वांच्या सेवेत आपली बालीश धावपळ करणारा लहानगा चि. उत्कर्ष संघर्ष सावळे हा किशोर वयीन बालक सर्वांच्याच नजरेत भरला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ॲड. सर्जेराव साळवे, दीपक नागरे ई. सह बहुतांश कवी-साहित्यिक-रसिकांनी आपल्या सोत्साह उपस्थितीसह हर्षोल्हासपूर्ण दाद देऊन या सोहळ्यास साहित्य संमेलनाच्या उंचीवर नेऊन ठेवले हीच या कार्यक्रमाची यशस्वीता म्हणावी लागेल.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!