May 9, 2024

अतिवृष्टीच्या निधीचा घोळ मिटेना;सोयगावात अद्यापही तेरा हजार शेतकरी वंचित

लोकनेता न्युज नेटवर्क

सोयगाव :- सोयगाव तालुक्यात चार महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या अनुदानाचा अद्यापही घोळ मिटलेला नाही त्यामुळे बाधित शेतकऱ्यांपैकी १३ हजार २६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही निधीची रक्कम वर्ग झालेली नाही तर यापैकी पुन्हा एक हजार ९०० शेतकऱ्यांच्या यादी दुरुस्ती साठी परत आल्यामुळे अतिवृष्टीच्या निधीचा मोठा गोंधळ सुरू आहे.
        सोयगाव तालुक्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात ३२ हजार ९८० शेतकरी बाधित झाले आहे या शेतकऱ्यांसाठी नुकसानी ची रक्कम प्राप्त झाली परंतु शासनाने महा डी बी टी च्या पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांची नावे अपलोड करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचा निधी वर्ग करण्याचा प्रयोग केला आहे परंतु अद्यापही १३ हजार २६१ शेतकऱ्यांची नावे आधार सिडिंग अभावी पोर्टलवर अपलोड झालेले नसून त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे पोर्टलवर शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड एन पी सी आय ला संलग्न असणे अनिवार्य आहे परंतु बँकांनी या आधी खातेदार शेतकऱ्यांचे आधार एन पी सी आय ला संलग्न न करता बँक खात्याला संलग्न केले आहे त्यामुळे अनुदाना च्या चौकशी साठी तहसील वर गेलेल्या शेतकऱ्यांना बँकेत जाऊन आधार संलग्न करण्याचा सल्ला दिला जात आहे बँकेत गेल्यावर मात्र तुमचे आधार खात्याला संलग्न असल्याचे उत्तर बँक अधिकारी देत असून या टोलवाटोलवी मध्ये शेतकऱ्यांना ना निधी मिळे ना समर्पक उत्तरे त्यामुळे शेतकऱ्यांची अतिवृष्टीच्या अनुदाना साठी भटकंती सुरू आहे.

चौकट :- धार संलग्न साठी महसूल काय म्हणतेय.
       अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम खात्यात वर्ग होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार एन पी सी आय या प्रणालीत संलग्न असावे लागते असे महसूल चे म्हणणे आहे तर बँकांनी आधीच शेतकरी खात्याला केवळ आधार संलग्न केले आहे त्यामुळे बँक आता पाहिले झालेले संलग्नी करण रद्द करून एन पी सी आय ला संलग्न करण्यासाठी असमर्थता दर्शवित आहे त्यामुळे आधार संलग्न अभावी सोयगाव तालुक्यातील तेरा हजार २६१ शेतकऱ्यांच्या नुकसानी पोटी १७ कोटी २७ लाख ९६ हजार ७०४ रु इतका निधी महा डी बी टी च्या खात्यात पडून आहे दरम्यान या तेरा हजार २६१ शेतकऱ्यांपैकी एक हजार ९०० शेतकऱ्यांची नावे त्रुटी मध्ये असून काही शेतकऱ्यांची नावे जिल्हाधिकारी यांच्या पोर्टलवर पडताळणी अभावी पडून आहे तर काही नावे तहसीलदार यांच्या पोर्टलवर पडून आहे तर अजून काही शेतकऱ्यांनी तलाठी यांना नावे अपलोड साठी आधार कार्डचा पुरवठा केलेला नाही त्यामुळे सोयगाव च्या अतिवृष्टीच्या निधी तिढ्यात अडकला आहे.
संकेतस्थळ बंद झाल्यास मोठ्या अडचणी वाढणार
        दरम्यान चार महिन्यापासून अतिवृष्टीच्या निधीचा प्रश्न रेंगाळत आहे त्यातच दुसरीकडे महा डी बी टी ने संकेतस्थळ बंद केल्यास त्रुटी ची यादीही दुरुस्ती होणार नाही व अतिवृष्टीच्या नुकसानी पासून सोयगाव तालुक्यातील त्रुटीच्या यादीत असलेल्या शेतकऱ्यांसह आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांचा निधीच्या गंभीर विषय होण्याची शक्यता आहे…
टपाल कार्यालयात खाते उघडा—महसूल चे शेतकऱ्यांना आवाहन
       अतिवृष्टीने बाधित झालेल्या व एन पी सी आय ला आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या टपाल कार्यालयात खाते उघडावे सदर खाते ४८ तासात अपडेट झाल्यावर अतिवृष्टीच्या नुकसानी च्या निधीची रक्कम थेट त्या खात्यात वर्ग होईल असे आवाहन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले आहे.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!