May 9, 2024

उर्वरित शेतकर्यां ना पिकविमा कंपनीने दिला “ठेंगा”

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

          काहीच महिन्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना उर्वरित पिकविमा पीकविमा मिळवा म्हणून,पुरेपुर प्रयत्न करण्यात आले. नव्हे नव्हे तर या साठी आंदोलने देखील झाली. परंतु राहिलेल्या शेतकर्‍यांना  पिकविमा मिळाला का..?
       उर्वरित पैसे दुसर्या् टप्प्यात देऊ असे पिकविमा कंपनीने संगितले होते,परंतु दूसरा टप्पा हा 2024 ला येणार आहे का हा मोठा प्रश्न मला पडतोय. आज पीकविम्याचा प्रश्नावर बोलणार कोणी नाही हे. ज्या वेळेस गरज भासेल त्या वेळेस शेतकर्‍याची पोर ज्या सत्ताधार्याोन माघ बोंबलत फिरते, त्या नेत्यांना पोरायहो तुम्ही कधी विचारले का, की साहेब पिकविमा कंपनीने आमच्या माय बापचे पैसे दिले नाहीत; याकडे थोड लक्ष घाला. का आम्ही फक्त तुमचे झेंडे घेऊन हिंडायला आहोत का अस विचारलय केव्हा तुम्ही तुमच्या नेत्याला…?

       काही शेतकर्यांलना विमा भरलेली रक्कम देखील विमा कंपनीने परत केली नाही. काहींना तर एक रुपया देखील मिळाला नाही. परंतु काही शेतकर्यां ना शेतीत उत्पन्न देखील झाले नसते इतकी रक्कम मिळाली. याला म्हणावं तरी काय माझा मते यालाच भ्रष्टाचार मुक्त नाव द्यावं की काय. राज्य शासनान एक रुपयात पिकविमा भरून देऊची घोषणा केली. पण मा.मुख्यमंत्री साहेब आमचे हजारो रुपये पिकविमा कंपनिकडे बाकी आहे त्याच काय, आज ते पैसे कंपनीने डुबले अस तुम्ही गृहीत धरून एक रुपया पीकविमा ची संकल्पना तर मांडली नाहीत ना? का तुम्हाला देखील शेतकर्‍याचा प्रश्न माहिती नाही. ज्या शेतकर्यांखच नुसकान झालाय त्यांना मदत देऊ अशी घोषणा तुम्ही सभेत केली पण आज प्रयंत उर्वरित पीक विमा मिळाला नाही या प्रश्नाच काय ?

           माझ्या शेतकरी माय-बापाच्या प्रश्नावर बोलणार कोणी उरले का नाही. मीडिया वालेतर महाराष्ट्रात शेतकरी जमात आहे ही बाब विसलेत, लोकशाहीचा चौथा तंभ पत्रकार असले तरी, हो मी एक संपादक नात्याने सांगेल की काहीच पत्रकार, काहीच मीडिया चैनल असे आहेत की ते सत्य परिस्तिती जगाला दाखवतात, नाहीतर शेतकर्यां च्या प्रश्नावर बोलणारे गलोगल्लीत दिसले असते. एकीकडे मा. अजित पवारांना देखील माहिती नसावं ते भाजपात जाताय म्हणून आणि इकडे मीडिया वाल्यांनी सहा वर्षाच्या लेकरान म्हणावं राष्ट्रवादी फुटणार आहे, इतका तर प्रचार केला. परत एकदा राजकीय भूकंप होतोय म्हणे. अरे हो होईल भूकंप पण या भूकंपाशी आमचा काही संबंध आहे का. आमच्या शेतार्यापला मोबाइल मध्ये टाकला पैसे नाहीत आणि अजित दादा चा फोन बंद आहे या बातम्यावरून काय कराच. बीड जिल्ह्यामध्ये विजा पडून शेतकर्यांइचे जनावर दगावली. गारांनी सर्व पिकाच होतच नव्हतं झाल. या वेळेत कुठ गेली मीडिया. नुसकान ग्रासतांना लवकर मदत मिळावी. पिकांचा विमा मिळवा या साठी उठवलाय का आवाज तुम्ही या माझा सर्व प्रिंट मीडिया, डिजिटल मिडियांना प्रश्न आहे. नाहीतर त्यांनी भलतसलत आठ आठ दिवस ब्रेकिंग म्हणून दाखवायच. ब्रेकिंग अॅपलच्या सीईओ ने बघा कुठे आणि कोना सोबत खाल्ला वडा पाव. अर राजा आमच्या शेतार्यांच्या जीवनाचा वडापाव होतोय हे कस तुला कळत नाही. इकड आमच्या आख्या गावात अॅपल चा फोन पहायला मिळत नाही. तुझ्या सीईओ ला पाहून काय कराव. मीडिया बद्दल हे कटू वाटत असल तरी हेच सत्य आहे.

         आज 3-4 महिने होऊन गेलीत कोणी बोलेल आठवतय का तुम्हाला की पीकविमा मिळणार कधी. मिळेले मिळेल म्हणून शेतकर्यां ना करा परत ऑनलाइन करा, हे करा ते करा,जा या ऑफिस ला त्या द्या तिथे अर्ज हे फक्त आश्वासनच होते का. पहिलेच त शेतकर्याकला कोणत्या हापिसात सॉरी ऑफिसात माणुसकीची वागणूक मिळत नाही. त्याला हापिसात म्हणलेलच योग्य ज्या शेतकर्यायसाठी ते चालत त्यालाच तिथे समतेची वागणूक नाही ते ऑफिस म्हणावं का.. आज सत्य परिस्थितिला कोणी बोलणार असेल तर बर होईल.
         शेतकर्याच्या हितासाठी लढता लढता हे राजकारनी श्रीमंत्त होतात, कोट्यवधी संपत्ती लुटून हे मोठे झालेत. पण ज्या शेतकर्याशसाठी तुम्ही हे सत्तेचे ढोंग केलेत त्या शेतकर्याीची काय अवस्ता आज आहे. या कडे कोणाचे लक्ष लागून नाही. कटू वाटत असेल तरी हेच सत्य आहे. आणि हो सत्य बोलणे जर हे बंड असेल तर आम्ही बंडखोर आहोत आणि…..शेतकर्या साठी लिहणे,बोलणे हा शेतकरी पुत्र म्हणून आमचा हक्क आहे.

•ज्ञानेश्वर बुधवत

  मुख्यसंपादक दैनिक लोकनेता

  मातृतीर्थ_सिंदखेड राजा

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

 

About Post Author

error: Content is protected !!