May 9, 2024

पत्रकारांचे सामाजिक दायित्व मोठे- आ. आकाश फुंडकर

प्रेस क्लब खामगावच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण

लोकनेता न्युज नेटवर्क

खामगाव :- पत्रकारिता करीत असतानाच खामगावातील पत्रकारांनी समाजसेवेचा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांचे सामाजिक दायित्व मोठे आहे, असे प्रतिप्रादन खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.
प्रेस क्लब खामगावच्यावतीने स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात आयोजित पत्रकार दिन सोहळा आणि मान्यवरांच्या सत्काराप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे मार्गदर्शक गौतम दुगड होते. प्रमुख अतिथी म्हणून हभप प्रकाश महाराज मोरखडे, बुलडाणा अर्बनचे डॉ. सुकेश झंवर, प्रसिध्द होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. दादासाहेब कविश्‍वर, डॉ. नंदकुमार पालवे, माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवर बुलढाणा अर्बनचे चीफ मॅनेजर डायरेक्टर सुकेश झंवर यांनी आपल्या भाषणातून सहकार्याची भूमिका ठेवून कार्य केले तर निश्‍चितच कल्याणकारी योजना राबवल्या जाऊन युवा वर्गांना प्रेरणा मिळेल. त्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी असे प्रतिपादन केले. सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळचे संस्थापक डॉ. नंदकुमार पालवे यांनी सामाजिक दायित्व समजून सर्वांनी समाजातील दिन दुबळ्यांची सेवा करण्यासाठी पुढे येण्याची नितांत गरज आहे. असे आवाहन केले. तर मानवतेचा विचार करून कार्य केल्याने निश्‍चितच आत्मशांती मिळेल व एकमेकांविषयी आदर निर्माण होईल असे नरहरी महाराज संस्थान भालेगावचे हभप प्रकाश महाराज मोरखडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपेक्षितांना न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढे आले पाहिजे पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. दिशा दाखविण्याचे कार्य पत्रकार करत असतात. पत्रकारिते सोबत लोकाभिमुख कार्य केले पाहिजे असे मत माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राजकुमारी चौहान, श्रीमंत शिवाजीराव देशमुख यांनीही सत्काराला उत्तर देतांना समयोचित मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत राजकुमार गोयनका, प्रल्हाद शर्मा, गिरीश राऊत, मंगेश तोमर, पांडुरंग काळे, नाना हिवराळे, पंकज ताठे, विनोद भोकरे, शिवाजी भोसले, सूरज बोराखडे, गणेश भेरडे, सचिन बोहरपी यांनी केले. प्रास्ताविक प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल गवई, लुकमान परवेज यांनी केले तर आभार सचिव ईश्‍वरसिंह ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार बांधवांसह मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.8-24

विविध पुरस्कारांचे वितरण
– यावेळी प्रेस क्लबच्यावतीने अतिशय मानाचा जिल्हा भूषण पुरस्कार श्रीमंत शिवाजीराव देशमुख, गौरव पुरस्कार डॉ. गौरव गोयनका, उद्योजक पुरस्कार सतीश राठी, कार्य गौरव पुरस्कार सौ. राजकुमारी चौव्हान तर स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार राहुल पहुरकर व स्व. गोवर्धनसेठ गोयनका स्मृतीप्रित्यर्थ योगशिक्षक कल्याण गलांडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय श्रीकांत भुसारी, दीपक महाकाळे, मोनाली वानखडे, अमोल गावंडे, मनोज नगरनाईक यांनी करून दिला.

About Post Author

error: Content is protected !!