May 9, 2024

“मा.सुधीर महाजन एक आदर्श प्राचार्य”- प्रा .अरुण बुंदेले

लोकनेता न्युज नेटवर्क 

अमरावती :- प्राचार्य मा.श्री सुधीर महाजन सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून ते शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल यासाठी सतत प्रयत्न करीत असतात . विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आपले शिक्षक व शिक्षकांनाही सतत मार्गदर्शन करीत असतात .प्रत्येक शिक्षकांना समजून घेऊन त्यांच्याकडून शैक्षणिक कार्य करून घेण्याची त्यांची पद्धत ही महत्त्वपूर्ण आहे .चित्र,व्याख्यान (मुद्देसूद ) ,
मार्गदर्शनपर, प्रश्नोत्तर ,चर्चा ,आशय, कथन , गायन अशा विविध अध्यापन पद्धतींचा उपयोग आपल्या शिक्षकांकडून करून घेत असल्यामुळे त्यांची शाळा दरवर्षी गुणात्मक आणि संख्यात्मक निकाल देत आहे . समाजाप्रती सरांना आस्था असून विविध थोर पुरुषांवरील त्यांचे व्याख्यान रसिकांना जगण्याची प्रेरणा देत असतात .विद्यार्थ्यांप्रति व समाजाप्रति प्रेम असणारे श्री सुधीर महाजन सर एक आदर्श प्राचार्य आहेत .” असे विचार वक्ते प्रा . अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
         ते पोदार इंटरनॅशनल स्कूल , अमरावती येथे दि .४ जानेवारी २०२३ ला प्राचार्य श्री सुधीर महाजन सरांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाप्रसंगी विचार व्यक्त करीत होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ ) प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले ( अध्यक्ष ,कै . मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ) ,प्रमुख अतिथी प्रा .एन .आर .होले , वसंतराव भडके ,अमन टेमुर्डे ( महाव्यवस्थापक पोदार इंटरनॅशनल स्कूल ) विनोद आडे , (वरिष्ठ प्रबंधक ,बँक ऑफ इंडिया ) , अक्षय लहाने ( वरिष्ठ प्रबंधक , बँक ऑफ इंडिया ) ,यशोधन देशपांडे ,( वरिष्ठ सहाय्यक ,बँक ऑफ इंडिया ) ,सुभाष दुबे (संपादक ,विदर्भ स्वाभिमान ) पुखराज राजपुरोहित होते . सत्कारमूर्ती श्री सुधीर महाजन (प्राचार्य , पोदार इंटरनॅशनल स्कूल , अमरावती ) यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल , पुष्पगुच्छ व प्रा.बुंदेले लिखित आदर्श अभ्यासाचे तंत्र व निखारा काव्यसंग्रह , प्रा . बनसोड यांचे ऋणानुबंध ही पुस्तके देऊन सर्व मान्यवरांनीअभिष्टचिंतन केले .
” श्री सुधीर महाजन सर विद्यार्थ्यांना दैवत मानणारे
       प्राचार्य ” -प्रा . श्रीकृष्ण बनसोड अध्यक्षीय भाषणातून असे विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले की ,
” प्राचार्य सुधीर महाजन सरांमुळे पोदार शाळेचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत आहे , त्याचे कारण म्हणजे श्री महाजन सरांचे अतिउत्तम प्रशासन होय .सर सुस्वाभावी असून ते आपल्या विद्यार्थ्यांना दैवत मानून त्यांच्यावर खूप प्रेम करतात तसेच समाजावरही त्यांचे प्रेम असल्याचे त्यांच्या विविध व्याख्यानातून मी स्वतः अनुभवले आहे . विविध विषयांवर त्यांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे ते रसिकांना खिळवून ठेवतात . त्यांच्या प्रत्येक भाषणातून समाजप्रबोधन झाल्याचे मला जाणवले आणि हे आज अत्यंत आवश्यक आहे .” असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी सुभाष दुबे , प्रा . एन . आर . होले ,अमन टेमुर्डे , पुखराज राजपुरोहित ,विनोद आडे यांनी आपले विचार व्यक्त केले .

       या कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री वसंतराव भडके यांनी मानले .

About Post Author

error: Content is protected !!