May 8, 2024

तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र उंटावर बसून शेळ्या हाकणाऱ्या साठी- विनोद आठवले

लोकनेता न्युज नेटवर्क

गेवराई :-  तालुक्यातील तलवाडा प्रथमिक आरोग्य केंद्र म्हणजे रुग्णासाठी मृतप्राय ठरत असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाहीत जे आहेत ते  काम चुकारपणा करत आहेत तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जरूरत असताना काम धकाऊ कर्मचाऱ्यावर या ठिकाणचा कारभार सुरू असल्याने नागरिकात व ग्रामस्थात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर हा कारभार म्हणजे या ठिकाणच्या दोन   हम करे सो कायदा  कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कळस गाठल्याने रुग्णांना या ठिकाणी वेळेवर सुविधा मिळत नाहीत काम चुकार कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार या आरोग्य केंद्रात होत असून या ठिकाणचे इन्चार्ज बनसोडे यांच्याकडे आसलेला चार्ज तात्काळ काडण्यात यावा नसता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असे आर. पी. आय सर्कल प्रमुख  विनोद आठवले यांनी बोलताना सांगितले.

या बाबत माहिती अशी की गेवराई तालुक्यातील सर्वात मोठे लोकसंख्येचे गाव असलेले तलवाडा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राचा  कारभार ढासळला असल्याचा दिसून येत आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कायम स्वरूपी दोन नियुक्ती करण्याची आवश्यकता असताना काम धकाऊ  या प्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर येथील  कारभार म्हणजे उटांवरून शेळ्या हाकणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे आहे त्यामुळे हा सर्व कारभार ढेपाळला असून या ठिकाणच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना या ठिकाणचे दोन कर्मचारी पाठीशी घालण्याचा प्रकार त्या संबंधित इन्चार्ज अधिकार्याच्या संगनमताने  होत आहे आणि यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना ग्रामस्थांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत  या ठिकाणी काम करणारे रात्रपाळीचे काम करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने वैद्यकीय दवाखाना थाटलेला असून यामुळे या ठिकाणी रात्री येणाऱ्या पेशंटला तो रेफर करत असल्यामुळे रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

तलवाडा प्रथमिक आरोग्य केंद्रांत  तत्काळ दोन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व उंटावरून कारभार हाकणाऱ्या बनसोडे नावाच्या डॉक्टरचा चार्ज तात्काळ काढण्यात यावा व ढेपाळलेला  या रुग्णालयाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न करावा नसता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असे रिपाईचे तलवाडा सर्कल प्रमुख विनोद आठवले यांनी म्हटले आहे.

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!