May 9, 2024

शिरूर येथे भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धा २०२३ चे आयोजन

लोकनेता न्युज नेटवर्क

शिरूर :- ” एक मैफिल कवितांची साहित्य मंच महाराष्ट्र राज्य “आयोजित शिरूर येथे भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी  सकाळी ९ वा. स्थळ:-शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय एसटी स्टँड जवळ शिरूर जि. पुणे येथे आयोजित केले आहे.

   हे काव्य संमेलन म्हणजे साहित्यप्रेमीसाठी व नवोदित साहित्यिकांसाठी एक पर्वणीच असते.

   या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ,पाठ्यपुस्तकातील कवी व गीतकार मा. हनुमंत चांदगुडे सर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. अमोल नानाभाऊ पठारे (घोडनदी एंटरप्राईजेस शिरूर )मार्गदर्शक म्हणून  प्रा. डी एस कुलकर्णी प्रा.डॉ. राजाभाऊ भैमुले, प्रा क्रांती पैठणकर .

    सत्कारमूर्ती म्हणून श्री गुलाबराव  दसगुडे दादा( उद्योगरत्न )डॉ. श्री नितीन पवार (पत्रकार काव्यरत्न)श्री.भाऊसाहेब पाचुंदकर (कामगाररत्न )श्री.सुरेश धोत्रे (साहित्यरत्न )डॉ.प्रा. ईश्वर पवार (काव्यरत्न) तसेच या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती म्हणून श्री. प्रसाद बोरकर (मुख्याधिकारी शि.न.पा)  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

     मंचातर्फे  कवींच्या कवितेना बक्षीस दिले जाणार आहे,  प्रथम क्रमांक कवीसाठी मानाची ढाल व रोख रक्कम ४४४४ रू, द्वितीय क्रमांक ३३३३ रू,  तृतीय क्रमांक  २२२२ रू व उत्तेजनार्थ ११११ रू रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. विशेष सहकार्य मा.मच्छिंद्र जामदार , श्री. संतोष काळे, श्री.विशाल जोगदंड, श्री. विशाल कांबळे , संतोषभाऊ शिंदे, श्री.अशोक ईश्वरे, सूत्रसंचालक प्रा.कवी तुषार ठुबे , श्री.नितीन रणदिवे हे करणार आहेत. 

    नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी १००  रू शुल्क असून अधिक माहितीसाठी कवी महाबली मिसाळ मो.९७३०३४४०४१ , कवी कुमोद रणदिवे मो.९०९६७२०९५७ यांच्याशी संपर्क साधावा.

    या  संमेलनाच्या नियोजनासाठी  अध्यक्ष कवी महाबली मिसाळ सर, उपाध्यक्ष कवी मनोज दिक्षित, खजिनदार डॉ.बाबा शिंदे , कार्याध्यक्ष  कवी कूमोद रणदिवे सर, सचिव कवी उमेश गोरे  या धडपडणाऱ्या प्रत्येक हातांनी ही साहित्याची चळवळ वृद्धींगत करण्यासाठीं हा मंच अहोरात्र कष्ट घेत आहे . 

  विश्वस्त श्री. अविनाश लष्करे ( कवी, लेखक) श्री. आनंद डोळस (कवी, लेखक, गायक, दिग्दर्शक) श्री. सुरज सुर्यवंशी (कवी, लेखक)

श्री. नितिन रणदिवे यांची ही उपस्थिती असणार आहे.

           एक मैफिल कवितांची या मंचाचा मूळ उद्देश नवकवींना ,साहित्यिकांना एक हक्काचा व्यासपीठ मिळाव म्हणून धडपड , आजच्या परिस्थिती आजच्या युगात नव साहित्यिकांसाठी धडपडणाऱ्या संस्थांची संख्या कमी असली तरी एक महफिल कवितांची या मंचाच्या माध्यमातून नक्कीच नव साहित्यिकांच्या  लेखणीला बळ हुरूप आल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच नवसाहित्यिकांची संख्या वाढेल.

प्रतिनिधी|संतोष कदम

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!